आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिक यांच्याविरुद्ध मंत्री जयकुमार रावल यांची अब्रुनुकसानीची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शेतकऱ्यांकडून जमिनी हडप केल्याचा आरोप करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी अब्रुनुकसानीची तक्रार दिली.  ठाण्यात मलिकांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रावल म्हणाले, आम्ही संस्थानिक आहोत. रावल परिवाराकडे भारत स्वतंत्र झाला त्या वेळी ५ हजार एकर जमीन होती. दोंडाईचात विविध शासकीय कार्यालयांच्या निर्मितीसाठी ही जमीन नाममात्र दराने तसेच मोफत उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा विचारही मनात येणार नाही.    


मंत्री जयकुमार रावल हे धर्मा पाटील यांच्यावरील अंत्यसंस्काराचा विधी अाटाेपल्यानंतर थेट दाेंडाईचा येथील पाेलिस ठाण्यात पोहोचले. सकाळी ११.३० वाजता त्यांनी मलिक यांच्याविराेधात तक्रार दिली. शिंदखेडा तालुक्यातील विखरण गावातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. सोमवारी रात्री मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही वृत्तवाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मोहंमद मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. त्या वेळी मलिक यांनी रावल परिवार हे भूमाफिया आहेत. माजी राष्ट्रपतींची जमीन त्यांनी बळकावली आहे. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत. त्यांच्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करा, असे तथ्यहीन व खोटे आरोप केले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मंत्री जयकुमार जितेंद्रसिंग रावल यांच्या तक्रारीवरून मलिक यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

आजोबांनी जमिनी दान केल्या :  रावल  
 विराेधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी माझ्यावर भूमाफिया असल्याचे आरोप केले आहे. आमच्या आजोबांनी दोंडाईचा येथे  शासकीय व निमशासकीय संस्थांच्या कार्यालयांसाठी  नाममात्र दरात किंवा मोफत जमिनी दिल्या. संस्थानिक असलेल्या आपल्या परिवाराला शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा विचार स्वप्नात आला नाही. मात्र, अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर पायउतार व्हावे लागलेल्या भ्रष्ट मंत्र्यांनी असे बिनबुडाचे आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असेही रावल म्हणाले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...