आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रास देणाऱ्या मंत्र्याचे नाव खडसेंनी मुख्यमंत्र्याकडे द्यावे; चंद्रकांत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - त्रास देणाऱ्या मंत्र्याचे नाव माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी  थेट  मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सांगितले पाहिजे. माध्यमांकडे जाऊन ही बाब उघड करणे ही भाजपची संस्कृती नाही. मंत्र्यावर पक्षाकडून योग्य ती कारवाई होऊ शकते, असे मत  महसूलमंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. खडसेंना त्रास देणाऱ्या मंत्र्याबाबत विचारले असता ते जळगावात पत्रकारांशी बाेलत हाेते.     


शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी   पालकमंत्री   पाटील  जळगावमध्ये आले होते. या वेळी  खडसेंच्या पत्रकार परिषदेतील खळबळजनक वक्तव्याबद्दल मत विचारण्यात आले. अंजली दमानिया यांच्या अाडून भाजपचे एक मंत्री अापल्याला त्रास देत असल्याचे  अामदार खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हाेते. याबाबत छेडले असता पालकमंत्री पाटील म्हणाले, खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते अाहेत. त्यांना पक्षाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती अाहे. त्यांनी माध्यमांकडे व्यथा मांडण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित मंत्र्याबाबत माहिती दिली पाहिजे. त्या मंत्र्यांवर पक्षाकडून याेग्य ती कारवाई हाेऊ शकते. 

 

घटनेबाबत राहुल गांधींनी माफी मागावी
वाकडी घटनेबाबत राहुल गांधी यांनी अपूर्ण माहितीच्या अाधारे शुक्रवारी टि्वट केले होते.  समाजात जातीय तेढ निर्माण हाेईल, अशी राजकीय फायद्याची प्रतिक्रिया दिली अाहे. राहुल गांधींसारख्या व्यक्तीने अपूर्ण माहितीवर सवर्णांवर अाग अाेकण्याची घाई केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सवर्ण दुखावल्याने त्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...