आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शरद अडकमोल बिनविरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किनगाव खुर्दचे उपसरपंच शरद अडकमोल. - Divya Marathi
किनगाव खुर्दचे उपसरपंच शरद अडकमोल.

यावल (जळगाव)- किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शरद अडकमोल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

 

 

किनगाव खुर्द ग्रामपंचायतीत 2 फेब्रुवारीला उपसरपंच पदाची निवडणुक होती. शुक्रवारी सकाळी सर्व सदस्यांनी एकत्र येत शरद बाबूराव अडकमोल यांची उपसरपंच म्हणून निवड केली. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक हितेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत सरपंच भुषण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध उपसरपंच म्हणुन निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बबलु काेळी, प्रशांत वसंत तायडे, जयमाला महेंद्र अडकमोल,अनिल रामराव पाटील, जरीनाबी जुम्मा तडवी, सिमा यशवंत पाटील, साबीर जमशेर तडवी, राजमाला विजय सपकाळे, हमीदाबी कडू पिंजारी असे सर्व सदस्य उपस्थित होते. सुरेश सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती


 

बातम्या आणखी आहेत...