आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करणाऱ्या मद्यपी पतीस जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दारू पिण्यासाठी न पैसे दिल्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी सळई मारून खून करणाऱ्या पतीस जिल्हा न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. धुंदऱ्या उर्फ धनसिंग देडा भिलाला असे त्याचे नाव आहे. त्याने पत्नी केकडीबाई हिच्या डोक्यात सळई मारून खून केला होता. 


गिरड (ता.भडगाव) येथील सुधाकर श्रावण चौधरी यांच्या शेतात धुंदऱ्या भिलाला (वय ५३, रा.गिरड, ता.भडगाव) हा सालदार म्हणून कामाला होता. शेतातच तो कुटुंबासह राहत होता. चौधरी यांची शेती दगडू रामराव गायकवाड यांनी कसण्यासाठी कराराने घेतली होती. ऑक्टोबर २०१४ रोजी दगडू गायकवाड यांच्या वाहनात भिलाला याचा चुलत भाऊ गिलदार भिलाला, त्याची पत्नी राणूबाई तसेच धुंदऱ्याची मुलगी निंबीबाई नाणीबाई या पाचोरा येथे बाजाराला गेल्या होत्या. सायंकाळी वाजता ते घरी परतले. त्यावेळी धुंदऱ्या हा पत्नी केकडीबाई हिस दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. तिने पैसे दिले नाही म्हणून त्याने सळईने तिच्या डोक्यावर वार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी मुलगी निंबीबाई पुढे आली; परंतु तिच्या मागे देखील तो सळई घेऊन धावल्याने ती पळून गेली होती. तसेच चुलत भाऊ गिलदार राणूबाई यांनाही त्याने धमकी दिली होती. त्यामुळे ते दोघीही पळून गेले होते. खून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ऑक्टोबर रोजी भडगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. 


फिर्यादीच झाला होता फितूर 
खटल्यात १२ साक्षीदार तपासले. मुलगी निंबीबाई, चुलत देरानी राणूबाई, दगडू गायकवाड, पंच धर्मा जावरे, तपास अधिकारी एन. डी. बोरस यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. दरम्यान फिर्यादी बादशहा हा फितूर झाला होता; परंतु सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केल्याने न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी धुंंदऱ्याला दोषी ठरवले. त्याला कलम ३०२ नुसार जन्मठेप हजार दंड तसेच दंड भरल्यास महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली. 


धंुदऱ्या काहीच बोलला नाही 
न्यायालयानेधुंदऱ्याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. शिक्षा ठोठावण्यापूर्वी त्याला काही म्हणने आहे काय? असा प्रश्न न्यायालयाने केला होता. या वेळी आपणास काहीच बोलायचे नसल्याचे त्याने सांगितले. खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर देखील त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप किंवा कोणतेच भाव नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...