आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना 474 कोटींची कर्जमाफी; रक्कम जमा झाल्याचे एसएमएस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील लाख ४९ हजार शेतकऱ्यांना ४७४ कोटी रुपये रकमेच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा बँकेला प्राप्त शंभर टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे. तीन हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाल्याबाबत मोबाइलवर एसएमएस पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे. 


राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दीड लाख रुपयांवरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. तसेच सन २०१५-२०१६ , २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे. 


अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. सन २००९-२०१० ते २०१५-२०१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील, त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळगाव जिल्ह्यातील लाख ४९ हजार शेतकऱ्यांना ४७४ कोटी रुपयांची आतापर्यंत कर्जमाफी मिळालेली आहे. सुमारे हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाइलवर पाठवून कळवले आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या लाख लाभार्थ्यांना १०० कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचेही जाधवर यांनी म्हटले आहे. 


दीड लाखांवरील कर्ज भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत 
निधीचे१०० टक्के वाटप करणारी जळगाव जिल्हा बँक ही पहिली बँक ठरली आहे. जिल्हा बँकेस प्राप्त असलेला निधी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केला आहे. जिल्ह्यातील सर्व दीड लाख रुपयांवरील लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी एक वेळ समझोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेच्या शाखेकडे ३१ मार्चच्या आत जमा करण्याचे कळवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...