आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला अविवाहित भासवून लावले लग्न; तरुणाची फसवणूक; चाैघांविरुद्ध गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा- विवाहितेचा पती अाणि मुलगा असताना अविवाहीत असल्याचे भासवून पाचाेरा येथील तरुणाशी लग्न लावून फसवणूक करण्यात अाली अाहे. हा प्रकार ९ जुलै २०१७ राेजी घडला. मात्र, याप्रकरणी तरूणाच्या तक्रारीनुसार मंगळवारी चाैघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला. 


तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील मध्यस्थी हिरामण विक्रम पाचपुते याने राजेंद्र नारायण थाेरात, अलकाबाई राजेंद्र थाेरात (रा. देवळी, ता. चाळीसगाव) यांच्याशी संगनमत करून त्यांची मुलगी स्वाती हिचा विवाह पाचाेरा येथील संभाजीनगरातील ईश्वर दामू निकुंभ (वय ३५) याच्याशी लावून दिला. स्वाती हिचा विवाह झालेला हाेता. तिचा पती हयात अाहे, तिला एक मुलगा अाहे. तरीदेखील निकुंभ याच्याकडून ५० हजार रूपये घेवून ९ जुलै २०१७ राेजी लग्न लावून दिले. स्वाती ही अविवाहीत गरीब व सुसंस्कृत असे सांगून विश्वास संपादन केला. निकुंभ याने लग्नात स्वातीच्या अंगावर ६८ हजाराचे दागिने घातले. तसेच लग्नासाठी २ लाख ५० हजार रूपये खर्च केले. याप्रकरणी निकुंभ याच्या फिर्यादीनुसार पाचाेरा पाेलिस ठाण्यात चाैघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...