आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या रेल्वेखाली विवाहितेची आत्महत्या; कौटुंबिक कलहाला कंटाळून उचलले टाेकाचे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कौटुंबिक कलहाला कंटाळून सिंधी कॉलनी येथील ४० वर्षीय विवाहितेने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री वाजता शिवाजीनगर उड्डाण पुलाखाली घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


कंचन श्यामलाल वालेचा (रा. जय समाधी अपार्टमेंट, सिंधी कॉलनी, जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. कंचन यांचा मृतदेह शनिवारी मध्यरात्री शिवाजीनगर रेल्वे पुलाखाली आढळून आला. कंचन त्यांचे पती यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू होते. समाजातील लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटवले होते. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास गेल्या असता पोलिसांनी सुद्धा त्यांच्यात सामंजस्य घडवून आणले होते. 


शनिवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यात त्या घरातून बाहेर पडल्या. रात्री वाजता त्यांचा मृतदेह रेल्वे रुळालगत आढळून आला. काही वेळातच कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून त्यांची ओळख पटवली. कंचन यांचे पती श्यामलाल यांचा बळीरामपेठेत चहा बूट विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा मुंबई येथे शिक्षण घेत आहे, तर मुलगी त्यांच्यासोबतच राहते. कंचन यांचे माहेर बाबानगर येथे आहे. रविवारी दुपारी वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...