आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने अाई, भावाची अात्महत्या; धुळ्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने आई आणि मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना धुळ्यातील साक्री राेडवरील पद्मनाभनगरात शनिवारी घडली. दरम्यान, समाजात बदनामी झाल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे. रत्नाबाई भटू दुसाने (५५) आणि कल्पेश  भटू दुसाने (२७) अशी मृतांची नावे आहेत.   

 

शहरातील पद्मनाभनगरातील खाेली क्रमांक २१७ रत्नाबाई या  पती भटू मुलगा कल्पेश यांच्यासह राहत होत्या. त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी दुसाने कुटंबोन २ एप्रिल राेजी मुलगी हरवल्याची तक्रार पाेलिसांत दिली होती.  पोलिसांनी केलेल्या तपासात रत्नाबाई दुसाने यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी ते राहत असलेल्या माेगलाई भागातील एका दुसऱ्या समाजाच्या मुलाबराेबर प्रेमविवाह केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पाेलिसांनी मुलगी व अाई, भावाची भेट घडवून देत दाेघांना समजावण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीबराेबरच राहणार असल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे रत्नाबाई व कल्पेश यांना माेठा धक्का बसला होता. त्यातच शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत रत्नाबाईच्या घराचे दार बंद असल्याचे अाजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा वाजवून बघितला. आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी परिसरात राहणाऱ्या एका पाेलिस कर्मचाऱ्याला या घटनेची माहिती दिली. काहींनी खिडकीतून आत डाेकावून बघितले. त्या वेळी त्यांना रत्नाबाई जमिनीवर पडल्याचे दिसून अाले. पाेलिसांनी घरात जाऊन पाहणी केली असता कल्पेश पलंगावर, तर रत्नाबाई जमिनीवर मृतावस्थेत पडलेल्या अाढळून अाल्या. या ठिकाणी दाेन स्टीलचे ग्लासही अाढळून अाले. दरम्यान, दुसाने यांची परिस्थिती बेताची असल्याने नागरिकांनी वर्गणी करून मृतांवर अंत्यसंस्कार केले.

बातम्या आणखी आहेत...