आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खडसे यांची अमेरिकेत शेतीपूरक प्रकल्पांना भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- खासदार रक्षा खडसे यांनी शनिवारी अमेरीकेतील कोका कोला बॉटलींग फॅक्टरीला भेट दिली. तेथील पर्यावरणपूरक कामांची अलाबामा यांनी खासदारांना माहिती दिली. महाराष्ट्रात आंबा, द्राक्ष, संत्री, मोसंबी, डाळिंब या सारख्या फळांचा रस काढून त्याचे पॅकिंग व बॉटलींग कशा प्रकारे करता येईल याची माहिती घेतली. 


यानंतर मायलो या आईस टी म्हणजे कोल्ड चहा पावडर बनविणाऱ्या कंपनीला भेट दिली. कंपनीच्या संचालिका पॅट्रीका सी वॉलवर्क यांनी कंपनीतील कामकाजाची माहिती दिली. जार्जीया पोल्ट्री लॅबोरेटरी नेटवर्क येथेही शिष्टमंडळाने भेट दिली. याठिकाणी डॉ दोउग वॉल्टमन आणि डॉ.अनिल कुलकर्णी यांनी पोल्ट्री संदर्भात माहिती दिली. पोल्ट्री फार्म मधील चिकन रोगराई पासून वाचवण्यासाठी, कशाप्रकारे काळजी घ्यावी याची माहिती त्यांनी दिली. या व्यवसायातील नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्रात लॅबोरेटरी नेटवर्क उभारण्याबाबत शिष्टमंडळाने माहिती घेतली. 

बातम्या आणखी आहेत...