आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका महागाई भत्त्याचे 2 टप्पे देणार; अांदाेलन पुढे ढकलले; अजय घेंगट यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ४१ काेटींच्या मागणीसाठी कामबंद अांदाेलनात उतरलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदरी महागाई फरकाच्या चार पैकी दाेन टप्प्याची रक्कम पडणार अाहे. या संदर्भातील सुमारे १ काेटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात बुधवारी वर्ग करण्यात येणार अाहे. त्यामुळे २५ पासून पुन्हा कामबंद अांदाेलन करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित ठेवल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अजय घेंगट यांनी दिली. 


गेल्या काही वर्षापासून महापालिका कर्मचाऱ्यांना अार्थिक अाेढाताण सहन करावी लागत अाहे. त्यांचे कर्जाचे हप्ते थकले असून विम्याची रक्कम देखील भरली जात नाही. वेतन अायाेगाचा लाभ मिळत नसून महागाई भत्त्याच्या रकमेसाठी कर्मचाऱ्यांना झटावे लागत अाहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या अाठवड्यात काळ्या फिती लावणे, लेखणी बंद अांदाेलन तसेच कामबंद अांदाेलन पुकारले हाेते. या वेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर यांनी २५ तारखेपासून गाळे कारवाई तसेच कर्मचाऱ्यांचे देणी अदा करण्याचे अाश्वासन दिले हाेते. अायुक्तांच्या अाश्वासनांची पूर्तता न झाल्याने संघटनेचे अध्यक्ष घेंगट यांनी मंगळवारी त्यांची भेट घेतली. या वेळी महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या फरकाचे २ टप्प्याचे १ काेटी अदा करण्याच्या सूचना लेखाधिकाऱ्यांना करण्यात अाल्याचे घेंगट यांनी सांगितले. 


निकालानंतर कारवाई 
२६ एप्रिल राेजी जिल्हा न्यायालयात गाळेधारकांनी ८१ 'ब'च्या अादेशाविरुद्ध दाखल केलेल्या दाव्यात निकाल देण्यात येणार अाहे. त्यामुळे २६ राेजीच्या निकालानंतर महापालिका प्रशासन गाळे कारवाई करण्याची शक्यता अाहे.

बातम्या आणखी आहेत...