आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लासात कमी दारू टाकल्याने मित्राचा दगडाने ठेचून खून, दोन मित्रांना अटक; तिसरा बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मेहरूण शिवारातील शिवाजी उद्यानात आढळून आलेल्या सोनू गोरख साळुंखे या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला आहे. ग्लासमध्ये दारू कमी टाकल्याचा राग आल्याने त्याचा तीन मित्रांनीच सोनूचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मच्छिंद्र तुकाराम नाथ व मोहन चंद्रकांत जाधव या दोन संशयित आरोपींना गुरूवारी सायंकाळी अटक केली. या प्रकरणातील तिसरा आरोपी गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख उर्फ गुड्डू हा बेपत्ता झालाआहे. 


बुधवारी दुपारी १.३० वाजता एका गुरख्यास सोनूचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह शिवाजी उद्यानातील झुडपांमध्ये आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर जखमा होत्या. कानातून व नाकातून रक्त आले होते. काही युवकांनी त्याचा मृतदेह ओळखल्या नंतर नातेवाईकांना माहिती दिली होती. त्यानंतर त्याचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले होते. नातेवाईकांनी सोनूच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलिस तपास करीत होते. मामाच्या घरी राहत असलेल्या सोनूला दारूचे व्यसन होते. 


चौघे सोबत प्यायले दारू 
मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरसोली नाकाजवळील दारूच्या दुकानाजवळ मच्छिंद्र, कानशा व मोहन हे तिघे मित्र सोनू याना शिविगाळ करीत होते. त्यावेळी सोनूचे मामा दिपक पाटील हे तेथे आले. त्यांनी सोनूला काय झाले आहे,याबाबत विचारले. त्याने कानशाच्या ग्लासात कमी दारू टाकल्याचा राग आल्याने चापटा, लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांनी शिविगाळ केल्याचे सोनूने मामाला सांगितले होते. त्यानंतर मामाने चौघांना समजावून हा वाद मिटवला. सोनू याला सोबत घेऊन तांबापूरा येथे सोडून कामाला निघून गेले. मामा निघून गेल्यानंतर तिघे सोनूला पुन्हा सोबत घेऊन गेले. मेहरूण शिवाजी उद्यानाजवळील झाडींमध्ये त्यांनी सोनूला पुन्हा दारू पाजली. त्यानंतर तिघांनी दगडाने ठेचून सोनूचा खून करून शिवाजी उद्यानातील झुडपामध्ये मृतदेह फेकला. दरम्यान,आरोपींनी दगडांनी ठेचून सोनूचा खून केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. 


चुलत मामाने बघितले चौघांना 
सोनू याचे मामा दिपक प्रतापसिंग पाटील यांचे चुलत भाऊ जयसिंग भागवत पाटील यांनी मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सोनूसह या ितन्ही आरोपींना शिवाजी उद्यानाकडे जाताना बघितले होते. भाचाने कानशाच्या ग्लासात दारू कमी टाकल्याने त्याचा मच्छिंद्र, कानशा व मोहन या तिघांना राग आला. त्यामुळे त्यांनी सोनूला मेहरूण शिवाजी उद्यानाच्या बाजूला असलेल्या वनीकरणाच्या झाडाझुडपात नेले. त्याच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू टाकून जीवे ठार मारल्याची फिर्याद सोनूचे मामा दिपक उर्फ बंडू प्रतापसिंग पाटील रा.न्यू सम्राट कॉलनी यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली आहे. दरम्यान,पंचनामा झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी रात्री २ वाजता मालेगाव तालुक्यातील नागोजीचे मडगाव येथे सोनूवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो...

बातम्या आणखी आहेत...