आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा हल्लाबाेल माेर्चा; नऊ मतदारसंघात हाेणार सभा; अामदार डाॅ. सतीश पाटील यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाराेळा- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, इंधन दरवाढ मागे घ्या, गॅस सिलिंडरचे भाव कमी करा, शेतमालाला याेग्य भाव द्या या मागण्यांसाठी राष्ट्रवादीने रान पेटवले अाहे. जिल्ह्यात याच विषयांवर १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन दिवस हल्लाबाेल अांदाेलन हाेईल. नऊ मतदारसंघात प्रत्येकी एक अशा नऊ सभा हाेतील. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते अाक्रमक भूमिका मांडतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी येथे दिली. 


पाराेळा शहरातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी (दि.१३) पत्रकार परिषद झाली. त्यात माध्यमांशी जिल्हाध्यक्ष डाॅ. पाटील यांनी वार्तालाप केला. जिल्हा परिषद सदस्य सदस्य रोहन पवार, तालुकाध्यक्ष बाळू पाटील, नगरसेवक व शहराध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ. शांताराम पाटील, मनोराज पाटील, दिगंबर पाटील, किशोर पाटील, संजय बागडे, कैलास पाटील, एस. एस. पाटील उपस्थित होते. अांदाेलनाच्या या तिसऱ्या टप्प्यात खानदेशात नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव येथे हे अांदाेलन हाेत अाहे. अांदाेलनाचा समारोप नाशिक येथेे हाेईल,. 


दुचाकी रॅलीने स्वागत हाेणार 
हल्लाबाेल अांदाेलनाची पाराेळ्यात जय्यत तयारी सुरू अाहे. पत्रके, बॅनर, फलक लावून या अनुषंगाने जनजागृती केली जात अाहे. १९ फेब्रुवारी राेजी रत्नापिंप्री येथून एक हजार दुचाकीस्वार कार्यकर्ते पक्षाचे ध्वज लावून पाराेळा शहराकडे स्वागत करत येतील. त्यानंतर नेत्यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली निघेल. सायंकाळी ६ सहा वाजता एन.ई.एस. हायस्कूलच्या मैदानावर जाहिर सभा हाेईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डाॅ. पाटील यांनी दिली. 


अांदाेलनाची रुपरेषा अशी 
जिल्ह्यात १९ रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर, दुपारी ३ वाजता चोपडा व संध्याकाळी ६ वाजता पारोळा येथे सभा हाेईल. २० रोजी याच वेळेत सकाळी रावेर, दुपारी बोदवड व संध्याकाळी जामनेर तर २१ रोजी सकाळी धरणगाव, दुपारी पाचोरा तर संध्याकाळी चाळीसगाव अशा सभा हाेतील. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी, गफ्फार मलिक व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहतील. 


सरसकट कर्जमाफीसाठी अाक्रमक 
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कापसाला योग्य भाव, शेतमालास हमी भाव, बोंडअळी नुकसानीची भरपाई द्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत द्या, आरक्षण, वाढती महागाई, गॅस सिलिंडर व इंधन दरवाढ, वीजभारनियमन, नोटबंदी व जीएसटीमुळे झालेली आर्थिक मंदी, शिष्यवृत्तीतील गोंधळ, शेती-उद्योग व अर्थव्यवस्था यांचा उडालेला बोजवारा, श्वेतपत्रिका काढा, धनगर समाजाचे आरक्षण, दलितांवरील वाढलेले अत्याचार, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार या विषयांवर हे अांदाेलन हाेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...