आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश खरंच कृषिप्रधान आहे का? अण्णांचा मोदींना सवाल; दिल्लीत 23 मार्चला होणाऱ्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- नवी दिल्लीत २३ मार्चला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र पाठवले आहे. ‘खरंच अापला देश कृषिप्रधान अाहे का?’ असा प्रश्न विचारून अण्णांनी सरकारच्या शेतकरीविराेधी धाेरणांचा समाचारही घेतला अाहे.  


पत्रात म्हटले आहे, ‘आपण अभिमानाने कृषिप्रधान भारत म्हणतो, परंतु गेल्या ७० वर्षांतील कृषी आणि शेतकऱ्यांची अवस्था पाहिली, तर आपल्याला कृषिप्रधान देश म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. एकीकडे आम्ही स्मार्ट सिटी, मेट्रो आणि औद्योगिक विकासाच्या हायटेक गोष्टी करत आहोत, तर दुसरीकडे भुकेने व्याकूळ झालेल्या झोपडीतील गरिबाकडे आणि लाखोंच्या संख्येने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहोत ही दुर्दैवाची बाब आहे.

बातम्या आणखी आहेत...