आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणा; ११० संस्थांचेच अद्याप झालेय फायर ऑडिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेने शहरातील रुग्णालये, शाळांना फायर यंत्रणा व त्यांचे अाॅडिट सक्तीचे केले. प्रत्येक इमारतीचे बांधकाम करताना अग्नी उपद्रव प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्ती केली आहे. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्रत्येक शासकीय कार्यालयांनाही फायर ऑडिटचे आदेश दिले आहेत. शहरात खासगी, शासकीय व निमशासकीय मिळून केवळ ११० इमारतींचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. या इमारतींची अग्निशमन विभागाकडून पडताळणी झाली. त्यानंतर आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. तरीही अद्याप बहुतांश संस्था फायर ऑडिटबाबत उदासीन आहेत. 

 

शासनाने शासकीय कार्यालये तसेच शाळांना फायर ऑडिट करण्याची सूचना केली. त्यानुसार अग्निशमन विभागाने सर्व शासकीय, निमशासकीय इमारती, रुग्णालय, शाळा, निवासी अपार्टमेंट यांना फायर ऑडिटसाठी दाेन वेळा नोटीस बजावली. यानंतर शहरातील ११० इमारतींचे फायर ऑडिट केले. त्यात शासकीय कार्यालय, काही रुग्णालये, शाळा, लहान उद्योगांचा समावेश आहे. या संस्थांचे फायर ऑडिट झाल्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाने फेरपडताळणी करीत काही उपाययोजना सुचवल्या. या उपाययोजनांची काही इमारतीत अंमलबजावणी केली. तर काहींना वारंवार सूचना करूनही परिणाम झालेला नाही. शहरातील इमारतींचे फायर ऑडिटची संख्या नगण्य अाहे. अद्याप बहुतांश इमारतींचे फायर ऑडिटच केलेले नाही. फक्त फायर एक्सटिंगुशर बसवत अग्नी उपद्रव उपाय केल्याचे दर्शविले. फायर ऑडिटसाठी स्थानिक एजन्सी उपलब्ध नाही. ज्या एजन्सी आहेत त्यात बहुतांश एजन्सी या मुंबई, पुणे येथील आहेत. या एजन्सींचा खर्च परवडत नसल्यामुळे बहुतांश शाळा, दवाखाने, खासगी निवासी इमारतींचे फायर ऑडिट करणे टाळण्यात येते. 


एमआयडीसीला हवे स्वतंत्र फायर स्टेशन 
अवधान औद्योगिक वसाहत व नरडाणा औद्योगिक वसाहतीचा झपाट्याने विस्तार होत आहे. या वाढत्या विस्तारानुसार दोन्ही एमआयडीसींमध्ये स्वतंत्र फायर स्टेशन आवश्यक आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीच्या हद्दीतील मोठ्या उद्योगांपैकी बहुतांश उद्योगांचे फायर ऑडिट झालेले नाही. 


अग्निशमन अधिकाऱ्यांचे पदच रिक्त 
मनपाचा स्वतंत्र अग्निशमन विभाग आहे. या विभागात मागील सहा वर्षांपासून अग्निशमन अधिकारी प्रमुख पद रिक्त आहे. सध्या अग्निशमन विभागाकडे पाच मोठे बंब, एक जीप आहे. त्यातील जुन्या दोन बंबांचा व एका टँकरचा लवकरच लिलाव होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...