आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- एेन निवडणुकीच्या ताेंडावर जिल्ह्यात लक्ष देऊ शकेल असा दुसरा सक्षम पर्याय नसल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने पुन्हा एकदा फेटाळला अाहे. साेमवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यपदी डाॅ. पाटील हेच राहणार असल्याचे जाहीर केले. या वेळी स्थानिक पातळीवर संघटनात्मक बाबीचे सर्वाधिकार डाॅ.पाटील यांना देण्यात अाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जळगाव जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये साेमवारी मुंबईत बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील पक्षीय संघटनावर चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष डाॅ. पाटील यांनी चार महिन्यात दुसऱ्यांदा पदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षातील वाढती गटबाजी, अंतर्गत कलह, संघटनेतील असंतुष्टांचे उठाव या विषयावर बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यातील सध्यस्थिती अाणि पक्षीय संघटन वाढवणे, टिकवून ठेवण्यासाठी अामदार डाॅ.सतीश पाटील यांनाच जिल्हाध्यक्षपदी कायम ठेवण्याची मागणी माजी खासदार अॅड.वसंतराव माेरे, पणन महासंघाचे संचालक संजय पवार यांनी केली. जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील अामदार डाॅ. पाटील यांच्याच नावाचा अाग्रह धरल्यामुळे सध्या जिल्हाध्यक्षपदी त्यांनाच कायम ठेवण्यावर एकमत झाल्याने त्यांचा राजीनामा फेटाळण्यात अाला.
दरम्यान, जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचे संघटनात्मक फेरबदलांचे अधिकार जिल्हाध्यक्षांनाच देण्यात अाले. मतदारसंघाकडे लक्ष देता यावे, तसेच पक्षीय व्यापातून वेळ मिळावा म्हणून दाेन्ही लाेकसभा मतदारसंघासाठी दाेन कार्याध्यक्ष नियुक्तीचे अधिकारदेखील जिल्हाध्यक्षांनाच देण्यात अाले. बैठकीत महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, माजी अामदार अरूण गुजराथी, गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, राजीव देशमुख, अरूण पाटील, दिलीप साेनवणे, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, प्रमाेद पाटील, साेपान पाटील यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
या कारणांमुळे पुन्हा निवड
पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव अामदार, राष्ट्रवादीचा अाक्रमक चेहरा, विराेधकांना ताेडीस ताेड उत्तर देण्याची क्षमता, पक्षांतर्गंत संघटनेवर पकड.
पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
पक्षात राहून अनेक जण विरोधीपक्षाचे काम करतात. विरोधकांशी सेटलमेंट करण्याचे प्रकार जिल्हा राष्ट्रवादीमध्ये जास्त प्रमाणात अाहेत. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही. इतर जिल्ह्यांपेक्षा जळगावची संघटना अाणि संघटनेतील विघ्नसंताेषीपणा जास्तच असल्याचे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्यादेखील दिल्या.
हल्लाबाेल अांदाेलनाचे नियाेजन
जिल्ह्यात येत्या १९ ते २२ जानेवारी दरम्यान हल्लाबाेल अांदाेलन करण्यात येणार अाहे. या अांदाेलनाचे नियाेजन करण्यासाठी प्रारंभी मुंबईतील बैठकीत चर्चा करण्यात अाली. या अांदाेलनासाठी अामदार डाॅ. यांचेच नेतृत्व ठेवावे अशी जाहीर मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. अामदार पाटील यांनी मात्र या बैठकीत काेणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, जिल्ह्यातील गटबाजी माेडून काढण्यासाठी मदत करण्याचा शब्द पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.