आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रियल इस्टेटमध्ये तेजी; वर्षभरात मुद्रांक शुल्क वसुली १११ टक्के

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नाेटबंदीनंतर मंदीमुळे संक्रमणावस्थेत असलेले रियल इस्टेट क्षेत्र सावरले अाहे. नोटबंदीनंतर धास्तावलेल्या नागरिकांनी या क्षेत्रात पैशांची गुंतवणूक करायला सुरुवात केल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारातही वाढ नोंदवण्यात आली. यंदा जिल्ह्याची मुद्रांक शुल्क वसुली तब्बल १११.२० टक्क्यांवर पोहोचली आहे. 

 

रियल इस्टेट क्षेत्रात मंदी असताना झालेल्या नोटबंदीने या क्षेत्राला नोव्हेंबर महिना संक्रमणाचा गेला. खरेदी-विक्रीला ब्रेक लागल्याने २०१६-१७ या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नव्हते. त्यानंतर मात्र, या क्षेत्रातील खरेदी- विक्रीचे व्यवहार पूर्ववत होऊन नोटबंदीच्या वर्षपूर्तीपर्यंत सरासरी वाढली. हळूहळू मंदीच्या सावटातून रियल इस्टेट क्षेत्र आता बाहेर पडले आहे. सन २०१६-१७मध्ये मुद्रांक शुल्क विभागाला १८४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ८ नोव्हेबर रोजी नोटबंदी जाहीर झली. त्यानंतर जिल्ह्यातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना ब्रेक लागला. बाजारात चलन तुटवडा निर्माण झाला होता. खरेदी-विक्री व्यवहारांबाबत 'वेट अॅन्ड वॉच'चे धोरण अवलंबण्यात आले. या वर्षात प्रत्त्यक्ष खरेदी- विक्रीच्या व्यवहारांपेक्षा सौदा पावती व मुख्त्यारपत्र आदी दस्त नोंदणी करण्यात आले. पर्यायाने मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. ६९ हजार ९३६ खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह ८९.३८ टक्क्यांवर मुद्रांक शुल्क वसुली थांबली. मंदीत असलेल्या रियल इस्टेट क्षेत्राला बुस्टर देण्यासाठी शासनाने यंदा रेडीरेकनर दरही 'जैसे थे' ठेवले. 


१९२ कोटी ३५ लाख रुपये वसूल 
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट ११ कोटींनी कमी करून १७३ कोटींचे देण्यात आले. नोटबंदीमुळे आलेल्या मंदीतून रियल इस्टेट सावरल्यामुळे जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार ७९ हजार १०१वर पोहोचले. मुद्रांक शुल्क १११.२० टक्क्यांवर पोहोचले. १९२ कोटी ३५ लाख रुपये मुद्रांक शुल्क जिल्ह्यात वसूल झाले. 


सर्वच दुय्यम निबंधकांची उद्दिष्टपूर्ती 
सह दुय्यक निबंधक (वर्ग २) सुनील पाटील यांनी उद्दिष्टाच्या २३१ टक्के, सहदुय्यक निबंधक (वर्ग २) जी. जी. पिंगळे यांनी उद्दिष्टाच्या ११८ टक्के, सह जिल्हा निबंधक (वर्ग १) आर. एल. पाटील यांनी १११ टक्के तर सह दुय्यक निबंधक (वर्ग २) आर. एम. कडाळे यांनी उद्दिष्टाच्या १०९ टक्के महसुली उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याबद्दल त्यांचा बुधवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे येथे सन्मान करण्यात आला. 
 

बातम्या आणखी आहेत...