आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली झाल्यानंतरही दीड वर्ष ग्रामसेवक ठाण मांडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - तब्बल दीड वर्षांपूर्वी बदली होऊनही वांजोळा (ता. भुसावळ) येथील ग्रामसेवक दीपक तायडे यांनी पदभार सोडला नव्हता. या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी गटविकास अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. स्पॉट व्हिजीट करुन दीड वर्षापूर्वीच बदली झालेल्या मोहन पाटील यांना पदभार देण्यात आला. 

 

वांजोळा येथील ग्रामसेवक दिपक तायडे यांची दीड वर्षांपूर्वीच बदली झाली आहे. त्याठिकाणी मोहन पाटील यांची नियुक्ती झाली होती. मात्र, यानंतरही दीपक तायडे हे पदभार देण्यास टाळाटाळ करत होते. याप्रकरणी वांजोळा येथील सरपंच नरेंद्र पाटील यांनी गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तरीदेखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सरपंचांसह काही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्या सावकारे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच बीडिओंना सोबत घेऊन वांजोळा ग्रामपंचायत कार्यालय गाठले. कपाटाचे कुलूप तोडून पंचनामा केला. पंचायत समिती सभापती सुनील महाजन, विस्तार अधिकारी उमेश पाटणकर यांनी पंचनामा केला. त्यात ग्रामपंचायत दप्तारामध्ये आफरातफर आढळली. तसेच संगणक गहाळ असल्याचे निदर्शनास आले. सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच देविदास सावळे, सदस्य संगिता तायडे, शोभाबाई पाटील, मंगलाबाई भिल हजर होते. 

 

कारणे दाखवा नोटीस देणार 
दीड वर्षांपूर्वी बदली होऊनही चार्ज न सोडणाऱ्या दीपक तायडे यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी सूचना यावेळी जिल्हा परिषद सदस्या सावकारे यांनी गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांना दिली. संबधित ग्रामसेवक हे निवृत्त गटविकास अधिकाऱ्यांचे सुपूत्र असल्याची चर्चा सुरू होती. 
 

बातम्या आणखी आहेत...