आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैरंगाबादहून आलेल्या अज्ञात प्रवाशाने जळगाव बसस्थानकात घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव बसस्थानकाच्या अावारात झाडाला उपरणे बांधून प्रवाशाने गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.४० वाजेच्या सुमारास उघडकीस अाली. अनाेळखी मृताच्या खिशात रांजणगाव ते नेवासा तसेच नेवासा ते अाैरंगाबाद प्रवासाची तिकीटे अाढळून अाल्याने ताे अहमदनगर अथवा अाैरंगाबाद जिल्ह्यातील असण्याची शक्यता अाहे.    


बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये एक प्रवासी बसच्या पाठीमागे भिंतीजवळ लघुशंकेसाठी गेलेला असताना एक जण गळफास घेतलेल्या अवस्थेत अाढळून अाला. त्याने तत्काळ नियंत्रण कक्षात माहिती दिली.  मृताची अाेळख पटलेली नसली तरी शरीराने सडपातळ असलेल्या मृताचे  वय सुमारे ३० ते ३२ वर्ष असण्याची शक्यता अाहे. त्याच्या उजव्या हातावर ‘इसाराम शिवराम सागरी ’असे नाव गाेंदलेले अाहे. त्याच्या खिशात ५०० रूपयाच्या ४ नाेटा आणि तंबाखू आणि चुन्याची पुडी तसेच बिडीचे बंडल अाढळून अाले. शिवाय, खिशात रांजणगाव ते नेवासा फाटा तसेच नेवासा फाटा ते अाैरंगाबाद असे शुक्रवारचे तिकीट मिळाले अाहे. यावरून ताे अाैरंगाबाद किंवा नगर जिल्ह्यातील रहिवासी असण्याची शक्यता  अाहे. दरम्यान ताे अाैरंगाबादहून कधी आणि कसा  जळगावात  अाला याबाबत काेणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याच्या कपाळावर डाेळ्याच्यावर जखम असल्याचे पाेलिस व प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात अाला अाहे. तरूणाने अात्महत्या केली की घातपात अाहे याबाबत चर्चा सुरू हाेती.  याप्रकरणी  जिल्हा पेठ पोलिसात रात्री उशीरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

बातम्या आणखी आहेत...