आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅक्टरीतील मशिनरी चोरीतील संशयिताला 13 वर्षांनी अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- फॅक्टरीमधील मशिनरी चोरून नेल्याच्या गुन्ह्यात १३ वर्षांपासून फरार असलेल्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री सुरत येथून अटक केली. चार वर्षांपासून तो सुरतमध्ये वेगवेगळ्या भागात राहून पोलिसांना चकवा देत होता. 


नवीनचंद्र कानजीभाई पटेल (रा.गणेश कॉम्पलेक्स, हरिओम सोसायटी, करतारग्राम, सुरत) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पटेल याने ३० ऑगस्ट २००४ रोजी प्रवीणचंद्र पटेल यांच्या कढोली (ता.एरंडोल) येथील फॅक्टरीतून ६९ हजार ५०० रूपयांच्या मशिनरी चोरल्या होत्या. फॅक्टरीचा कर्मचारी विजय जुनागडे यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पाेलिस ठाण्यात सात जणांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील नामदेव पौलाद पाटील, वाळू जगन्नाथ देशमुख, जिजाबराव साहेबराव पाटील, लतीफ शहा गुलाब शहा तानाजी दादा शिंगारे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या जामिनावर मुक्त आहेत. तर सुरक्षारक्षक सुभाष पाटील याच्यासह नवीनचंद्र पटेल हे फरार होते. पटेल हा कोल्हापूर, पुणे, मुंबईत सातत्याने प्रवास करीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. तर डिसेंबरपासून तो सुरतमध्ये होता. त्यानुसार रविवारी नीळकंठ पाटील, शरीफ काझी, संजय सपकाळे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर यांच्या पथकाने सुरत गाठून त्याला अटक करून सोमवारी पहाटे जळगावात आणले. पुढील तपासासाठी त्याला एरंडोल पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

 

सुरक्षारक्षकचाही शोध अंतिम टप्प्यात 
याप्रकरणातीलपाच जण आधीच अटक झाले आहेत. तर पटेल यांच्या रुपाने सहावा संशयित मिळाला आहे. आता सुरक्षारक्षक सुभाष पाटील हा एकमात्र संशयित बाहेर आहे. तो पटेल यांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. त्यानुसार सुरक्षारक्षकाची माहिती काढण्यात आली आहे. दोन दिवसांत त्यालाही अटक करून संशयितांचे वर्तुळ पूर्ण करण्याचा विश्वास पोलिसांना आहे. 
सुरत येथून एलसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात 


पटेलयांची वर्षानुवर्षे फिरस्ती 
कौटुंबिकवादातून पटेल बंधूंमध्ये फुट पडली. यातूनच हा गुन्हा घडला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नवीनचंद पटेल यांनी तब्बल १४ वर्षे वेगवेगळ्या शहरात फिरस्ती करून निवारा शोधला. सन २०१३ पासून सुरत शहरात स्थायिक झाले होते; परंतु तेथेही अटकेची शक्यता असल्यामुळे पाच वेळा घर बदलले. 

बातम्या आणखी आहेत...