आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: डमी ग्राहक पाठवून गावठी कट्टे विकणाऱ्यास वैजापुरात पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- डमी ग्राहक पाठवून गावठी कट्टे जिवंत काडतूस विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयितास वैजापूर (ता.चोपडा) गावात साेमवारी अटक केली. गेल्या आठ दिवसांपासून पथक त्याच्या मागावर होते. 


उमर्टी गावात गावठी कट्टा तयार करण्याच्या भट्ट्या असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु पोलिसांचा छापा पडण्याच्या आत या भट्ट्या हलवल्या जातात. अजयसिंग कल्याणसिंग बरनाला (वय २१, रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी) हा युवक गेल्या काही महिन्यांपासून चोपडा, मध्य प्रदेश भागात गावठी कट्टे विक्री करतअसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक त्याच्यावर नजर ठेऊन हाेते. तो ग्राहकाच्या शोधात असल्याची खात्री पथकाला मिळाली. अखेर सोमवारी सकाळी अजयसिंग याने वैजापूर गावात कट्टे आणून देतो, असे सांगितले. त्यानुसार पथकातील पोलिसांनी गावाच्या चारही दिशेने सापळा रचून ठेवला होता. 


डमी ग्राहकाने फोन करून अजयिसंगचे लोकेशन घेतले. वैजापूर गावातील ग्रामपंचायत चौकात व्यवहारास सुरुवात होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अजयसिंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गावठी कट्टे तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. दुपारी त्याला पोलिस मुख्यालयात आणण्यात आले होते. अाराेपीस पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक फौजदार मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, नारायण पाटील, रवींद्र गायकवाड, बापू पाटील, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, गफुर तडवी, मनोज दुसाने, योगेश पाटील, महेश पाटील, प्रवीण हिवराळे, दीपक पाटील, लक्ष्मण शिंगाने, संजय येडे यांनी दोन स्वतंत्र पथक तयार केली हाेती. अजयसिंगला सोमवारी खाक्या दाखवल्यानंतर त्याने उमर्टीसह परिसरातील कट्टे तयार करणाऱ्या भट्ट्यांची माहिती दिली आहे. त्याचा तपास करण्यासाठी एलसीबीचे एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. 


८० हजारांचे कट्टे 
अजय सिंग याने तीन कट्टे ८० हजार रुपयांत विक्री करण्याचे ठरवले होते. तर जिवंत काडतुसांची किंमतही हजार रुपये ठरवण्यात आली होती. एकूण ८३ हजार रुपयांत हा व्यवहार ठरला होता. डमी ग्राहकाने पैसे सोबत ठेवले होते. याच जाळ्यात अजयसिंगला अडकवण्यात पोलिसांना यश आले. 


राज्यभरातील अनेक शहरांमध्ये नेटवर्क 
अजयसिंगने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उमर्टीत कट्टा तयार करण्याच्या भट्ट्यांवरून राज्यभरात संपर्क केले जातात. या नेटवर्कच्या अाधारे अनेक शहरांत कट्टे पुरवण्याची जबाबदारी घेतली जाते. विश्वासू मध्यस्तीमार्फत व्यवहार केले जात नाहीत; परंतु एकदा विश्वास पटल्यानंतर एकाच व्यक्तीसोबत सातत्याने सुद्धा व्यवहार होतात. 

बातम्या आणखी आहेत...