आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाेबत अशिक्षित पालकही गिरवतात मराठी अन‌् इंग्रजीचे धडे, जळगाव पब्लिक स्कूलचा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून दी जळगाव पीपल्स बँकेने जळगाव पब्लिक स्कूल सुरू केली अाहे. सीबीएसई पॅर्टनच्या या शाळेत परिसरातील १८७ मुलांना शिक्षण देत असताना त्यांच्या पालकांनाही शिक्षण देऊन मुलांच्या भवितव्यासाेबतच पालकांचे वर्तमान 'उज्ज्वल'करण्याचा उपक्रम सहा महिन्यापासून राबविण्यात येत अाहे.

 

जळगाव पीपल्स बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित जळगाव पब्लिक स्कूल ही शाळा महापालिकेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षाापासून सुरू झाली अाहे. या शाळेत नर्सरी ते पहिलीचे वर्ग अाहेत. सामान्य कुटुंबातील पाल्यांना येथे प्रवेश दिला जाताे.


पाल्यांना सुटी असली तरीही पालकांची शाळा सुरु
घरच्या परिस्थितीमुळे शाळेतच न गेलेल्या चार पालकांसह मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याने इंग्रजीचा गंध नसलेल्या पालकांचा यात समावेश अाहे. त्यांचे मराठी व इंग्रजी असे स्वतंत्र वर्ग करण्यात अाले अाहेत. शाळेच्या इमारतीत दाेन वर्ग त्यासाठी राखीव ठेवण्यात अाले. त्यांना अ, ब, क, ड, अ, अा, ई पासून ते ए, बी, सी, डी या प्राथमिक शिक्षणापासून शिकविले जाते. अनेकदा पाल्यांच्या शाळेला सुटी असते; पण पालकांची शाळा रविवार साेडून दरराेज भरते. या वर्गातील पालक विद्यार्थ्यांसाटीअक्षर अाेळख, मराठीत लिहिलेल्या शब्दाला इंग्रजी लिहणे, स्वत:चे नाव इंग्रजीत लिहिणे, इंग्रजीत स्वाक्षरी करणे या स्पर्धा घेतल्या जातात. पूनम चाैधरी या इंग्रजी, तर काेमल पाटील या मराठी विषय शिकवतात. तर कैलास पाटील हे त्यांचे शिक्षणाबाबत समुपदेशन करतात. त्यांना ट्रस्टचे महाव्यवस्थापक संताेष नवगाळे व शिक्षिका गायत्री पाटील, शैलजा अामाेदे यांचे मार्गदर्शन असते.

 


पहिल्यांदा शाळेत अाले
वडील शेतकरी व अाम्ही तीन भावंड असल्याने माझे शिक्षणच झाले नाही. त्यामुळे लिहिता वाचता येत नाही. मुलाला नर्सरीत टाकले. मी या शाळेत शिकत असल्याने मला लिहता वाचात येऊ लागले अाहे.
- जयश्री गणेश शिरसाळे, पालक विद्यार्थी

 

वाचनाची हिंमत वाढली
नपाच्या याच ठिकाणच्या शाळा क्रमांक ६ मध्ये सातवीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर शिक्षण झाले नाही. व्यवस्थित वाचताही येत नव्हते. या वर्गात अाल्याने मला वाचनाची हिंमत अाली. मराठी वाचनाचा सराव वाढविला.
- अरुण वाणी, पालक विद्यार्थी

 

बातम्या आणखी आहेत...