आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव बाजार समितीच्या उपसभापतिपदी पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती लक्ष्मण पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर झालेल्या राजकीय तडजाेडीमध्ये इतर सदस्यांना उपसभापतीपदाची संधी देण्याचा विषय हाेता. त्यानुसार उपसभापती कैलास चाैधरी यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या रिक्त जागेवर साेमवारी मनाेहर पाटील यांची निवड करण्यात अाली. 


जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे सभापती प्रकाश नारखेडे यांच्यावर अविश्वास अाणून शिवसेनेचे लक्ष्मण पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागली हाेती. या वेळी भाजपचे बाजार समिती सदस्य देखील अविश्वास ठरावाच्या वेळी लक्ष्मण पाटील यांच्यासाेबत हाेते. या नव्या राजकीय समिकरणांमध्ये शिवसेनेसाेबत अालेल्या संचालकांना उपसभापतीपदाची संधी देण्याचा शब्द देण्यात अाला हाेता. या राजकीय तडजाेडीतील पहिली अाश्वासन पूर्ती म्हणून उपसभापतिपदी भाजपच्या गटाचे मनाेहर पाटील यांची वर्णी लागली. बाजार समितीच्या सभागृहात साेमवारी ही निवड करण्यात अाली. या वेळी सभापती लक्ष्मण पाटील, माजी उपसभापती कैलास चाैधरी, संचालक अनिल भाेळे, प्रभाकर साेनवणे, प्रकाश नारखेडे, शशिकांत बियाणी, सुनील महाजन यांच्यासह अन्य संचालक उपस्थित हाेते. 

बातम्या आणखी आहेत...