आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार यांच्‍यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात जाणार; भाजप अामदार अनिल गाेटे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख अाराेपी अब्दुल करीम तेलगी याने नार्को टेस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले आहे, असा अाराेप करुन  या प्रकरणात त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा  या मागणीसाठी लवकरच अापण न्यायालयात जाणार असल्याची माहिती  भाजप आमदार अनिल गोटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज मोरे आणि भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून अाराेप-प्रत्याराेप सुरू अाहे. शुक्रवारी त्यांनी एकमेकांना अाव्हान देत पत्रकार परिषद घेतली. या वेळी आमदार गोटे म्हणाले की, तेलगीच्या पुराव्यामध्ये शरद पवार यांचे नाव २१ वेळा घेण्यात आले आहे. छगन भुजबळ यांचाही त्यात समावेश आहे. तेलगी याने समीर भुजबळ व इंधनचा काळाबाजार करणारे गिरीष चढ्ढा यांचेही नाव घेतले होते. तेलगीने स्मारकासाठी देणगी दिल्यामुळे त्यांचे नाव कोनशिलेवर घेतले. त्याच्याशी मैत्री असल्यामुळेच मला विनाकारण मुद्रांक घोटाळ्यात गोवण्यात आले. कारागृहात असतांना मला राम जेठमलानी भेटण्यासाठी आले हाेते. त्यांनी सांगितले म्हणून शरद पवारांना वाचविले. परंतु आता शरद पवार यांचे नाव मुद्रांक घोटाळ्यात वर्ग करावे म्हणून न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  

बातम्या आणखी आहेत...