आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील चाळे करणाऱ्या तीन तरुणांना बदडले; नागरिकांनी व्हॉट्सअॅपवर पाठवले पाेलिसांना फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका गल्लीत बुधवारी दुपारी १२.३० वाजता मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या तीन टुकार तरुणांचे फोटो काढून नागरिकांनी थेट पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवले. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीन टुकार तरुणांना बदडून काढीत त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. 


संजय सुकलाल पवार (वय १९), महेश बाळू पाटील (वय २०, दोघे रा.सिद्धी विनायक शाळेजवळ, अयोध्यानगर) आनंद शरद धनगर (वय १८, रा.म्हाडा कॉलनी) असे टवाळखोरांचे नावे आहेत. या तिघांसह अाणखी एक-दोन तरुण बेंडाळे महाविद्यालयाच्या मागच्या गल्लीत मुलींसोबत अश्लील चाळे करीत होते. 


बुधवारी दुपारी या परिसरातील काही नागरिकांनी मुला-मुलींचे फोटो काढून पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवले. तेथील कर्मचाऱ्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड, रवी पाटील, प्रशांत पाठक अकबर तडवी हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून काही टुकार मुलांसह मुलींनीही पळ काढला. त्यापैकी तिघे तरुण पोलिसांच्या हाती लागले. या तिघांना पोलिसांनी जागेवरच ‘प्रसाद’ दिला. त्यानंतर पोलिस ठाण्यात आणून बदडले. 


दुचाकी केली जप्त 
तीनपैकी संजय पवार या तरुणाकडे दुचाकी (एमपी ६८ एमबी ३९४५) सापडली आली आहे. परंतु त्याच्याकडे दुचाकीचे कागदपत्र, वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे पोलिसांनी दुचाकी जप्त केली. दुचाकी नातेवाइकांनी दिल्याचे उडवा-उडवीची उत्तरे त्याने पोलिसांना दिली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...