आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल (जळगाव)- मल्याळम चित्रपट 'ओरू अदार लव्ह' यातील वादग्रस्त गाण्यावर बंदी घालण्याची मागणी यावल शहरातील मुस्लिम बांधवांनी केली आहे. या चित्रपटातील एका गाण्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.
सोशल नेटवर्कवर मल्याळम चित्रपट 'ओरू अदार लव्ह' यातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार हिचा नेत्रकटाक्ष सध्या चर्चेत आहेे. त्यातच या चित्रपटातील एका गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप देखील होत आहे. याबाबत यावल शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनेे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे तसेच निवासी नायब तहसिलदार वैभव पवार यांना निवेदन देेण्यात आले आहेे. यावेळी अजहर शेख, साजीद शेख, अपशाकक शाह, समिर शेख चिरागोद्यीन, महेबूब खान, शेख वाहिद शेख रऊप, रसुल खान कादर खान उपस्थित होते.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.