आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित महिलेला छेडणाऱ्या माथेफिरूला नागरिकांनी बदडले, रामानंद परिसरातील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सुमारे पाच वर्षांपासून विवाहितेची छेड काढत असलेल्या एका माथेफिरूला पकडून नागरिकांनी चांगलेच बदडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी दुपारी ४.३० वाजता रामानंदनगर परिसरात ही घटना घडली.

 

श्रद्धा कॉलनी भागात राहणारी ही विवाहिता आहे. तर रफीक शेख मजीद (रा.मन्यारवाडा, कोळीपेठ) असे माथेफिरूचे नाव आहे. ही विवाहिता पाच वर्षांपूर्वी महाबळ परिसरात राहत असताना देखील हा माथेफिरू दररोज तिचा पाठलाग करीत होता. नंतर विवाहितेच्या पतीने त्याच्यापासून पिच्छा सोडवण्याच्या उद्देशाने श्रद्धा कॉलनीत घर घेतले. त्यानंतर काही वर्षे माथेफिरू पासून सुटका झाली होती. काही दिवसांपूर्वी हा माथेफिरू श्रद्धा कॉलनीत देखील येऊ लागला होता. विवाहिता घराबाहेर पडताच तो पाठलाग करीत असे. या प्रकारामुळे महिला अत्यंत भयभीत त्रस्त झाली होती. तिने पतीला आपबीती सांगितली होती. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची योजना महिला तिच्या पतीने आखली. त्यानुसार बुधवारी विवाहिता रामानंदनगर परिसरात गेली असता हा माथेफिरू मागे आला. तिने आरडा-ओरड करीत परिसरातील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी माथेफिरूला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या भागात देह विक्री करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी, असे निवेदन शहिद शेरे टिपू सुलतान बहुउद्देशीय संस्थेने एमअायडीसी पाेलिसांना दिले अाहे.

 

गैरप्रकार होत असल्याच्या संशयावरून मारहाण
बुधवारीदुपारी वाजता तांबापुरा भागात एका घरात गैरप्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त करीत परिसरातील नागरिकांनी घरात असलेल्या दोन महिला एका पुरूषाला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. बुधवारी बाहेरून आलेले महिला-पुरूष त्या घरात गेल्यानंतर नागरिकांनी सर्वांना घराबाहेर काढले. तसेच एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांची तक्रार करण्यासाठी परिसरातील सुमारे ५० महिला पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. दरम्यान, बाहेरून आलेले लोक कामानिमित्त आल्याचे घरमालक महिलेने पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणी तिघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...