आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 दिवसांच्या अात पोलिसांना मिळणार 30 लाखांपर्यंत गृहकर्ज; राजेंद्र सिंह यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राज्यात पोलिस वसाहतींचा प्रश्न आहे. तर राज्यातील ८० हजार कर्मचाऱ्यांना घरांची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांना शासकीय घरे मिळण्याला विलंब लागेल. मात्र, शासनाने एका बँकेशी करार केला आहे. पोलिसांना आता स्वत:च्या घरासाठी ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. ते सुद्धा ३० दिवसांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्रसिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच प्रलंबित खुनांच्या गुन्ह्याच्या छडा लावून तपास पूर्ण करण्यासाठी जळगाव पोलिस दलाला एक महिन्याचा अल्टिमेटम दिल्याचेही सांगितले. 


पोलिस अधीक्षकांच्या दालनात पत्रपरिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. राजेंद्रसिंह म्हणाले, जिल्ह्यात गुन्ह्यांचा दर कमी झाला असला तरी गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण कमी झाले आहे. ते वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलिस दलात वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपाबाबतच्या प्रश्नांवर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेल सुरू केले आहे. यासाठी सॉफ्टवेअर खरेदी केले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लवकरच सायबर क्राइम पोलिस ठाणे कार्यान्वित होतील, असे सांगितले. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत विचारल्यावर यांचा तपास ठाण्यांच्या प्रभारींकडे दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली. या वेळी अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग, प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. 


पोलिस आयुक्तालय तूर्तास शक्य नाही 
गेल्याअनेक वर्षांपासून जळगाव-भुसावळ पोलिस आयुक्तालयाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मीरा, भाईंदर, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांमध्ये अद्याप आयुक्तालय होण्याची प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे जळगाव-भुसावळ पोलिस आयुक्तालय होणे तूर्तास शक्य नाही. या प्रक्रियेला विलंब लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...