आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे हवालदार उमेश धनगर यांचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा(जळगाव)- चोपडा नागलवाडी रस्त्यावर दि 2 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रात्रीच्या बंदोबस्तावर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे याच्या शेताजवळ पोलिस हवालदार उमेश धनगर यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी मारून घेतली आहे.

 


बंदुकीची गोळी ही जवळून डाव्या खांद्यावर मारली असून चुकून छातीवर लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता तरी छातीच्या वरच्या बाजूस डाव्या खांद्यांवर लागलेली बंदुकीची गोळी पुढून मागे आरपार निघाल्याने मोठा रक्तश्राव झाला होता. उमेश धनगर हे सध्या चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात असून दि. 2 रोजी रात्री चोपडा-वैजापूर रस्त्यावर तेल्या घाटात रात्रीच्या बंदोबस्तावर असताना त्यांनी स्वतः वर गोळी मारून घेतल्याने त्यांना चोपडा येथील हरताळकर हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर रात्री उशिरा जळगाव येथे ऑर्किड हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविल्यात आले आहे. हवालदार उमेश धनगर हे चोपडा तालुक्यात परिचित असे हवालदार असून त्यांची चोपडा शहर पोलिस ठाण्यातून बदली होऊन ते आता ग्रामीण पोलीस ठाण्यात आहेत.


धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांनी देखील दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेचे नेमके कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ही घटना ताजी असताना चोपड्यात ग्रामिण पोलीस ठाण्याचे हवालदार उमेश धनगर यांनी स्वतःवर गोळी मारून घेतली असली तरी या घटनेबद्दल चोपडा शहरात पोलिस प्रशासनात एकच चर्चा सुरू होती.

 


उमेश धनगर यांनी स्वतःवर जी बंदुकीची गोळी मारून घेतली त्याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी सांगितले की, धनगर यांच्या घरी काही किरकोळ कौटुंबिक वाद होते, दुपारी त्याचे सासू, सासरे घरी आले होते, त्यांनी धनगर यांना समज दिली होती. रात्री त्याची चोपडा वैजापूर रस्त्यावर ड्युटीवर असताना त्यांनी स्वत:वर गोळी मारून घेतली आहे. आता त्याची प्रकृती चांगली आहे.

बातम्या आणखी आहेत...