आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुरख्यात आणले मारेकरी; वकीलपत्र घेण्यास नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - देवपुरातील चंदननगर परिसरात राहणाऱ्या सनी ऊर्फ प्रशांत साळवे याच्या खून प्रकरणातील तिघा संशयितांना शुक्रवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात आणले. प्रकरणातील गांभीर्य आणि तणावात्मक स्थिती पाहता बुरख्यामधून तिघांना न्यायदानकक्षात हजर करण्यात आले. परंतु या तिघांच्या वतीने कोणत्याही वकिलाने वकीलपत्र स्वीकारले नाही. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर विधी सेवा प्राधिकरणाने एका वकिलाची नियुक्ती केली. 

शालेय विद्यार्थी सनी ऊर्फ प्रशांत यांचा बुधवारी रात्री निर्घृणपणे खून करण्यात आला. तर इतर अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेनंतर काल गुरुवारी दुपारी एलसीबीने अटक केलेले वैभव अंबादास गवळे ( वय २१, रा रामकृष्णनगर, नकाणे रोड) , गोपाल बन्सीलाल चौधरी ( वय २८, रा रामभाऊ चौक, विटाभट्टी), किशोर प्रल्हाद बाविस्कर ( वय ३३, रा नेहरूनगर) यांना पोलिस ताफ्यातून न्यायालयात आणण्यात आले. कडेकोट बंदोबस्तातून पोलिसांनी तिघांना न्यायालयात आणले. एवढेच नव्हे तर गुन्ह्यातील संवेदनशीलता आणि संशयितांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी तिघांना बुरखा घालून न्यायालयात आणले. उपअधीक्षक सचिन हिरे, पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डेे यांच्या पथकाने या तिघांना पोलिस संरक्षणात न्यायदान कक्षात न्या. सय्यद यांच्यासमोर त्यांना उभे केले. कामकाजाच्या वेळी त्यांचा बुरखा काढण्यात आला. परंतु प्रत्यक्षात कामकाज सुरू होताना न्यायालयातील एकाही वकिलाने तिघा संशयिताच्या बाजूने वकीलपत्र घेतले नाही. संशयितांना नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार बाजू मांडण्याचा अधिकार असल्यामुळे विधी सेवा प्राधिकरणाकडून त्यांना वकील उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना करण्यात आली. त्यामुळे शासकीय खर्चातून या संशयितांना प्राधिकरणाने वकील उपलब्ध करून दिला. घटनेतील गांभीर्य आणि अद्याप फरार असलेले इतर संशयित पाहता न्यायालयाने तिघा संशयितांना शुक्रवार दि. २७ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर संशयितांना घेऊन पोलिस वाहन तेवढ्याच संरक्षण व वेगाने न्यायालयाच्या आवाराबाहेर पडले. या वेळी न्यायालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर शहर परिसरातून अनेक संतप्त नागरिकांची ही गर्दी झाली होती. 

 

संशयित अन् हत्यांरांचा शोध 
घटनेतील इतर संशयित मात्र अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी एलसीबी, देवपूर पोलिसांचे पथक बाहेरगावी गेले आहेत. याशिवाय संशयितांच्या मित्र व निकटवर्तीयांकडेही चौकशी सुरू आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारेही अद्याप पोलिासांना मिळालेले नाही. त्यांचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित एकाच परिसरातील असल्याने ओळखही करून घेतली जात आहे. 


टपरी जाळली, बसवर दगडफेक 
देवपुराती भतवाल चित्रपटगृहाजवळील एका बारजवळ असलेली शेंगदाणे, फुटाणे विक्रीची टपरी रात्रीतून पेटविण्यात आली. हातगाडीवर ही टपरी ठेवण्यात आली होती. शिवाय सावरकर पुतळ्याजवळील हातगाडीवर विक्री करणाऱ्यांनाही दमबाजी झाली. तर गुरुवारी रात्री अकरा वाजता याच चौकात एमएच- २०, बीएल १५९४ या क्रमांकाच्या बसवर तर चितोड चौफुलीजवळ एमएच- ०४, बी- ८४५९ व एमएच- २०, - ८५३३ यावर दगडफेक झाली. 

बातम्या आणखी आहेत...