आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर रस्त्यासाठी अांदाेलनस्थळी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले लेखी अाश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत समांतर रस्ता करण्यात यावा, या मागणीसाठी समांतर रस्ते कृती समितीने बुधवारी अजिंठा चाैफुलीवर सुमारे ५० मिनिटे अांदाेलन केले. सकाळी १०.४५ वाजता अांदाेलन सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटाला जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर हे अांदाेलनस्थळी अाले. त्यांनी एप्रिल महिन्यात समांतर रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केला जाईल, असे लेखी अाश्वासन दिल्यानंतर अांदाेलन मागे घेण्यात अाले. विशेष म्हणजे अांदाेलनस्थळी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लेखी अाश्वासन देण्याचा जळगावच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग हाेता.

 

जळगाव समांतर रस्ते कृती समितीने समांतर रस्त्यांच्या कामासाठी जाेरदार अांदाेलन केले. गुरुवारी सकाळी १० वाजेपूर्वीच अजिंठा चाैफुलीवर विद्यार्थी, शिक्षक हजर हाेते. सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. महापौर ललित कोल्हे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर रमेश जैन, डॉ.राजेश पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अमर जैन, करीम सालार, मुफ्ती हारून नदवी, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, ललित बरडीया, विनोद देशमुख, गनी मेमन, कैलास सोनवणे, विष्णू भंगाळे, जमील देशपांडे, गोपाल दर्जी, किरण बच्छाव, मुकुंद सपकाळे, अनिल जोशी, रवींद्र पाटील, गजानन मालपुरे नगरसेवक, नगरसेविका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, व्यापारी, जळगावकर नागरिक हे चौफुलीच्या चारही बाजूने बसले. चौफुलीच्या उजव्या बाजूला कृती समितीतर्फे मंडप टाकण्यात आला हाेता. याठिकाणी समितीचे शंभू पाटील, दिलीप तिवारी, नगरसेवक अनंत जोशी, फारुख शेख हे सर्वांना अांदाेलन शांततेत करण्याचे आवाहन करीत होते. तर महामार्गावर मध्यभागी गोलाकार करून अांदाेलक बसले होते. त्यांच्या बाजूला माेकळी जागा साेडून का. ऊ. कोल्हे विद्यालय, इकरा हायस्कूल, रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, मिल्लत हायस्कूल, मू. जे. महाविद्यालय, सिद्धिविनायक हायस्कूल, आयएनआयएफडी, उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे पदाधिकारी विद्यार्थी बसलेले हाेते. या वेळी पथनाट्य, अादिवासी गीत सादर करण्यात अाले. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका प्रेतयात्रेला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला.

 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, तहसीलदार अमोल निकम हे आंदोलनस्थळी आले. ते थेट व्यासपीठावर गेले. या वेळी त्यांना समांतर रस्ते कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव समांतर रस्ते कृती समितीतर्फे नेमण्यात आलेले तटस्थ निरीक्षक आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, सचिन नारळे, अनिल कांकरीया, शिरीष बर्वे, ललित बरडिया, करीम सालार, युसूफ मकरा, अॅड.सुशील अत्रे, डी.डी. बच्छाव, डॉ.राजेश पाटील, अशोक पाटील आदींना समांतर रस्त्यांच्या कामाबाबत लेखी आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर ११ वाजून ३५ मिनिटांनी महामार्गावरील आंदोलन मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...