आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोंडाई येथील घटनेतील आरोपीच्या अटकेसाठी तेली समाजाने मुंबई-आग्रा हायवे रोखला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- दोंडाई येथील घटनेबाबत नागरिकांमध्ये असलेला रोष आज रस्त्यावर दिसून आला. मुंबई-आग्रा महामार्ग आज रोखण्यात आला होता. राज्यभर पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यासाठी तेली समाज आक्रमक झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर तेली समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले.धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे 8 फेब्रुवारी रोजी पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमीष दाखवले आणि शाळेच्या आवारात नराधमाने बलात्कार केला. त्यानंतर राज्यभर तेली समाज आक्रमक झालेला आहे. नराधमाला अटक करावी आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलकांच्या आहेत. धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील सुरत बायपास सर्कलजवळ तेली समाजाने रास्ता रोको केला. अर्धातास झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

 

बातम्या आणखी आहेत...