आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेशात त्रुटी आढळलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांना धावण्याची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिस्त प्रिय म्हणून ओळख असलेले राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी तपासणीदरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले होते. तर बुधवारी सकाळी शहरातील पोलिस कवायत मैदानावर झालेल्या परेड दरम्यान त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केली. यात गणवेशात त्रुटी आढळून आलेल्या काही कर्मचाऱ्यांना त्यांनी मैदानावरच धावण्याची शिक्षा केली. 


अतिरिक्त पोलिस महासंचालक सिंह हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी त्यांनी भुसावळ जळगाव शहरात तपासणी केल्यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी वाजेपासून पोलिस कवायत मैदानावर कर्मचाऱ्यांची परेड घेतली. या वेळी बॅन्ड पथक, शस्त्रधारी पोलिस पथक, महिला पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस यांच्या स्वतंत्र तुकड्यांनी त्यांना मानवंदना दिली. प्रारंभी सिंह यांनी सर्व कर्मचाऱ्यांजवळ जाऊन कसून चौकशी केली. यात अनेकांनी काळ्या ऐवजी वेगवेगळ्या रंगाचे पायमोजे परिधान केले होते. गणवेशातील या त्रुटींमुळे त्यांनी पाेलिस कर्मचाऱ्यांना मैदानावरच धावण्याची शिक्षा दिली. त्यानंतर परेडच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. तसेच दंगा नियंत्रणाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. दंगा नियंत्रण करीत असताना सुरुवातीला लाठीचार्ज, नंतर अश्रुधूर शेवटी हवेत गोळीबार करून गर्दी पांगवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आहे. 


तसेच दंग्यात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात पोहोचवण्याचाही प्रसंग साकारण्यात आला होता. परेडचे संचलन उत्कृष्ट झाल्याबद्दल सिंह यांनी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचे त्यांच्या सर्व पाेलिस कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले. 

 

आपल्या गरजा मर्यादीत ठेवा : सिंह 
आदर्शपोलिसिंग कशी असावी, यासंदर्भात सिंह यांनी मंगलम हॉल येथे झालेल्या पोलिस दरबारात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले, प्रत्येकाने ध्येयवादी असले पाहिजे; पण ध्येय आणि अपेक्षा यातील फरक ओळखा. अपेक्षा खूप असल्या तरी आपल्या गरजा मर्यादीत ठेवा, असे सांगितले. तसेच पोलिस दलात सेवा देत असतानाच विविध क्षेत्रांमध्ये, खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या १४ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. ‘शायनिंग स्टार’ म्हणून या कर्मचाऱ्यांना संबोधण्यात आले. यात पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक राहुल पाटील, विकास यावलकर, मिलिंद केदार, भालचंद्र नगरकर, विनोद अहिरे, संघपाल तायडे, सचिन चौधरी, रवींद्र वंजारी, धनराज गुळवे, विकार शेख, प्रीत चौधरी, हिरालाल चौधरी दिलीप पाटील यांचा समावेश आहे. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक कराळे यांनी यांनी केले. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आभार मानले. 


बुधवारी सायंकाळी वाजेपासून संपूर्ण जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी प्रेरणा हॉल येथे गुन्हे बैठक घेण्यात आली. यात सर्व विभागांनी पीपीटीच्या माध्यमातून आपल्या कामांचा आढाव दिला. पीपीटी पाहिल्यानंतर सिंह यांनी त्यात अनेक सुधारणा सुचवल्या. चाळीसगाव फैजपूर विभागाने सादर केलेल्या माहितीमध्ये प्रचंड चुका दिसून आल्यामुळे सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. यासह सर्व विभागांाच्या कामकाजात सूचना केल्या आहेत. डॉ.मोरे खून, भादली हत्याकांड, तरसोद एटीएम फोडल्याच्या गुन्ह्यांचा तपासावर सूचना केल्या. जिल्ह्यात पोलिस निरीक्षकांसह सहाय्यक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षकांच्या २० रिक्त जागा असून त्या भरण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 


विभागांची पाहणी 
दुपारच्या सत्रात सिंह यांनी पोलिस मुख्यालयातील विविध विभागांची तपासणी केली. तसेच मुख्यालय परिसरातील कर्मचारी निवासस्थाने, रूग्णालयाची पाहणी केली. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना कामाच्या संदर्भात त्यांनी सूचना केल्या. पोलिस कर्मचाऱ्यांचे पगार तारखेला झाले पाहिजे, पदोन्नतीचे अहवाल देखील दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत पाठवण्याच्या सुचना सिंह यांनी केल्या. 

बातम्या आणखी आहेत...