आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- टॉवर चौकात मागून येणाऱ्या भरधाव मालवाहू रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. यातील जखमी तरुणीचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी मंगळवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांनी रिक्षाचालकास सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी धरून सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
संदीप उर्फ भूषण रामदास मोरे असे शिक्षा झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. २५ जानेवारी २००९ रोजी बळीराम पेठेतील सविता परदेशी ही तरुणी दुचाकीने टॉवर चौकातून जात असताना मागून येणाऱ्या मालवाहू रिक्षाने (क्रमांक एमएच १९ एफ ३१८०) तिच्या दुचाकीला धडक दिली होती. यात ती गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. यानंतर योगेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात मोरे याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा खटला न्यायालयात सुरू झाला. याप्रकरणी न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, त्याचा मित्र तसेच तपासी अंमलदार व इतरांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे अॅड.राजेश त्रिमुखे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.