आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकीला दाेर बांधून थेट एटीएम पळवण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकामुळे वाचले 12 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटीएम मशीन दोराने ओढून नेणारा चोरटा सीसी टीव्हीत कैद झाला. - Divya Marathi
एटीएम मशीन दोराने ओढून नेणारा चोरटा सीसी टीव्हीत कैद झाला.

जळगाव- चारचाकी व एटीएमचे मशीनला दोर-खंडाने बांधून मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न चार दरोडेखोरांनी केला; परंतु, सुरक्षारक्षकाने समयसूचकता ठेवत दराेडेखाेरांना ‘एटीएम दोन दिवसांपासून बंद आहे, त्यात पैसेच नाही’ असे सांगितल्यामुळे चाैघांनी काढता पाय घेतला. त्यामुळे एटीएम मशीन सुरक्षित राहिले. या मशीनमध्ये सुमारे १२ लाख रूपये होते. ही घटना पहाटे ४.१० वाजता दादावाडी परिसरातील  आयडीबीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

दादावाडी परिसरात महामार्गाला लागूनच आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. भावसिंग झिपरू सपकाळे (वय ६२, रा. वृंदावन कॉलनी) हे खासगी कंपनीचे सुरक्षारक्षक तेथे कर्तव्यावर होते. पहाटे ४.१० वाजता एका चारचाकीने चार दरोडेखोर एटीएमजवळ आले. सर्वांनी अंगावर शाल ओढलेली हाेती, तसेच तोंडावर मास्क लावलेले होते. चार पैकी एक दरोडेखोर एटीएम केंद्रात आला. त्याने सपकाळे यांना चॉपर दाखवून शांतपणे जमिनीवर बसण्याची धमकी दिली. त्यानुसार सपकाळे खाली बसले. यानंतर बाहेर असलेल्या तिघांनी चारचाकीतून दोरखंड काढला. त्याची एक बाजू चारचाकीच्या मागे असलेल्या बंपरला बांधली तर दुसरी बाजू एटीएम मशीनला गुंडाळली. त्यानंतर चारचाकी पुढे घेऊन एटीएम मशीन ओढून नेण्याची त्यांची तयारी झाली होती. जवळपास दोन मिनिटात त्यांनी ही तयारी केली. दरोडेखोर चारचाकी सुरू करणार तेवढ्यात सुरक्षारक्षक सपकाळे यांनी एका दरोडेखोरांशी बोलण्यास सुरुवात केली. हे ‘एटीएम दोन दिवसांपासून बंद आहे, त्यात पैसेच नाहीत’ असे सपकाळे यांनी दराेडेखाेराला सांगितले. यानंतर काही सेकंदातच दरोडेखोरांनी दोरखंड सोडून काढता पाय घेतला. त्यानंतर चारही दरोडेखोर चारचाकी वाहनाने खोटेनगरच्या दिशेने निघून गेले.

 

दरोडेखोर २५ ते ३० वर्ष वयोगटातील 
चारचाकीतून आलेले सर्व दरोडेखोर सुमारे २५ ते ३० वर्ष वयोगटातील हाेते. त्यातील एकाच दरोडखोराला सपकाळे यांनी स्पष्टपणे पाहिले आहे. निळी जीन्स पॅण्ट व सफेद शर्ट घातलेल्या या दरोडेखोराने हातात चॉपर घेऊन सपकाळे यांना धमकावले होते. इतर दरोडेखोर दोरखंड बांधत असताना देखील तो माझ्या जवळच उभा होता, असे सपकाळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...