आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेत सेमी इंग्रजीची प्रश्नपत्रिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर (जळगाव)- येथील सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना चक्क सेमी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका स्कॉलरशिप परीक्षेत आल्याने विद्यार्थी गोंधळात पडले. त्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असून याबाबत झालेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी दिली आहे.

याबाबत पालकांनी दिलेल्या निवेदनात शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रार केली आहे.

 

 

रविवारी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या 5 वी आणि 8 वीच्या वर्गांची स्कॉलरशिप परीक्षा होती. तालुक्यातील 9 केंद्रांवर ही परीक्षा सुरु होती. त्यात सेंट मेरी शाळेचे 117 विद्यार्थी हे येथील साने गुरुजी विद्यालयातील सेंटर क्रमांक 330301 येथे तर इतर विद्यार्थी जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात परीक्षा देण्यासाठी हजर होते. त्यात दोन्ही ठिकाणी हा घोळ झाल्याने त्या विद्यार्थ्यांना परीक्षेत खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. याबाबत पालकांनी केंद्र संचालक शरद सोनवणे यांच्यासह केंद्रसंचालक राकेश साळुंखे, पर्यवेक्षक भटू पाटील आदींना विचारणा केली. शाळा प्रशासनाकडून परीक्षा अर्ज भरताना चूक झाल्याने जशा आल्या तशा प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. ही चूक सर्वस्वी शाळा प्रशासनाची आहे, असे त्यांनी सांगितले. आलेले पेपर आम्ही दिले, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

शहरातील इतर इंग्रजी शाळांनी स्कॉलरशिप अर्ज भरताना बरोबर भरले त्याप्रमाणे त्यांना प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या मात्र या शाळेच्या भोंगळ कारभारामुळे पालक वर्ग संतप्त झाला होता. यावेळी पालकांनी शाळेचे प्राचार्य यांना बोलावले मात्र त्यांनी परीक्षा केंद्रावर येण्यास असमर्थता दाखविली. त्यांनी कारकून पाठवल्याने पालक वर्ग अधिक संतप्त झाला आणि त्यांनी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांना बोलावले. यावेळी अर्ज भरताना ऑप्शन मिळत नसल्याने सेमी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका आल्याचे कारकून यांनी सांगितले.

 

 

याबाबत पालक किरण सिसोदे, चंद्रशेखर पाटील, किरण पाटील, श्रीकांत वाघ, भटू पाटील राजेंद्र महाले,  लक्ष्मण पाटील, देविदास महाले, नवनीत बडगुजर, कविता बोरसे, अर्चना मोरे, स्वाती साळुंखे, अर्चना चौधरी, चंद्रकांत मोरे, हिंमत सूर्यवंशी आनंद पाटील यांच्यासह अनेक पालकांनी तक्रार अर्ज गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांच्याकडे सुपूर्द केला.

 

 

झालेल्या प्रकार गंभीर असून याबाबत पालकांनी आपल्याकडे अर्ज दिला आहे. त्याची सखोल चौकशी करून संबंधित शाळा प्रशासनाला नोटीस बजावून योग्य ती कारवाई करण्यात येईल,  असे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी सांगितले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...