आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस आणि धनराज मानेंवर अॅट्राॅसिटीचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव- अपमानास्पद वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. धनराज माने  यांच्यासह चाैघांवर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पाेलिस ठाण्यात गुरुवारी (दि.८) अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात अाला.   


उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रयाेगशाळा संचालन संशाेधन केंद्राचे संचालक प्रा. महेंद्र सुपडू पगारे यांनी धरणगाव पाेलिस ठाण्यात त्यांच्याविराेधात फिर्याद दिली हाेती. त्यात म्हटले अाहे की, डाॅ. श्रीपाल सबनीस (पुणे), डाॅ. भगवंतराव भास्कर पाटील (कुलसचिव, उमवि), डाॅ. केशव तुपे (सहसचिव, उच्च शिक्षण विभाग, जळगाव), डाॅ. धनराज रघुराम माने (संचालक, उच्च शिक्षण विभाग पुणे) हे सन २०११ पासून ते अाजमितीपर्यंत अनुसूचित जातीचा असल्याचे माहित असूनसुद्धा मला त्रास देतात. त्रासदायक कार्यवाही करून खाेटी माहिती सादर करून छळ केला, असे पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या चाैघांवर गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...