आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाेपलेली विद्यार्थिनी वर्गात अडकली, तासाभराने सुटका; अंधारामुळे भेदरल्याने फाेडला हंबरडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शाळा सुटल्यानंतर वर्गखोली बंद करून घेतल्याने मागील बाकावर झोपलेली वर्षांची मुलगी सुमारे पाऊणतास शाळेत अडकून पडल्याचा खळबळजनक प्रकार भिलपुरातील पालिकेच्या चौबे शाळेत मंगळवारी सायंकाळी घडला. जाग आल्यानंतर वर्गखोलीतील अंधारामुळे भेदरल्याने तिने हंबरडा फोडत मदतीची याचना करून खिडकीतून आवाज दिला. योगायोगाने शाळेच्या अावारात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांना हा प्रकार लक्षात अाल्यानंतर त्यांनी कुलूप ताेडून तिची सुटका केली. 


बालाजीपेठेतील तनिष्का हरीश तिवारी ही चौबे शाळेत चाैथीत शिकते. ती मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेतील तिसऱ्या मजल्यावरील वर्गात गेली. दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर तिला झाेप येऊ लागल्याने ती मागील बाकावर जाऊन झाेपली. सायंकाळी ५.१५ वाजता शाळा सुटल्याची घंटा झाली. तरीही तिला जाग अाली नाही. मात्र, वर्गातले सर्व विद्यार्थी बाहेर पडल्यावर वर्गशिक्षिका इंगळे या वर्गखाेलीला कुलूप लावून निघून गेल्या. त्यानंतर वाजता तिला जाग अाली. या वेळी सर्वत्र अंधार पसरलेला पाहून तिने रडायला सुरुवात केली. तितक्यात तिला मैदानावर फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा अावाज अाला. त्यानंतर तिने अाेरडायला सुरुवात केली. याच वेळी फुटबॉल खेळताना एका खेळाडूने बाॅलला जाेरदार कीक मारली. त्यामुळे फुटबॉल थेट तिसऱ्या मजल्यावर जाऊन पडला. ताे बाॅल घेण्यासाठी दाेन जण तिसऱ्या मजल्यावर गेले. तेव्हा त्यांना लहान मुलीचा रडण्याचा अावाज अाला. त्यामुळे प्रथम ते घाबरले. मात्र, नंतर हिंमत करून ते त्या वर्गखाेलीजवळ गेले. 


मुलांच्या पावलांचा अावाज अाल्याने तनिष्काने रडणे थांबवून जाेरजाेरात दरवाजा ठाेकण्यास सुरुवात केली. मला बाहेर काढा अशी विनवणी केली. त्यानंतर त्या दाेघांना काय घडले अाहे, याची कल्पना अाली. त्यांनी अाेरडून खाली असलेल्या खेळाडूंना वर बाेलावले. त्यानंतर सर्वांनी मिळून वर्गखाेलीचे कुलूप ताेडून तनिष्काला बाहेर काढले. बाहेर पडताच तिने पुन्हा रडायला सुरुवात केली. तिला जवळ घेऊन तिला खाली अाणले. त्यानंतर पाणी पाजून विचारपूस करून तिला त्याची मामाच्या घरी बालाजीपेठेत साेडले. तिला झाेपण्याची सवय असल्याचे तिची पालनकर्ती अाजी तिवारी यांनी सांगितले. 


तनिष्काला घेतलेले दत्तक 
तनिष्काही मूळची इंदूर येथील रहिवासी अाहे. तिच्या अाईवडिलांचा अपघातात मृत्यू झाल्याने ती अात्याकडे राहत हाेती. सध्या ती जळगावचे बेन्टेक्सच्या दागिन्याचे कारागिर नंदू तिवारी यांच्याकडे राहते. तिवारी यांची बहीण आणि तनिष्काची आत्या या मैत्रीणी आहेत. तनिष्काच्या अात्याचे माेठे कुटुंब असल्याने ती तिला वागवू शकत नसल्याची माहिती नंदू तिवारी यांच्या बहिणेने दिली होती. त्यानंतर तिवारी यांनी दीड वर्षापूर्वीं दत्तक घेऊन तिला जळगावात अाणले असून तिचे शाळेत नावदेखील टाकले अाहे. 


मुलीच्या झाेपण्याच्या सवयीमुळे चूक 
तनिष्काच्या वर्गशिक्षिका मंगला पिंगळे यांनी तनिष्काला नेहमीच झाेपण्याची सवय असल्याने नजर चुकीने ही चूक झाल्याचे‘ दिव्य मराठी’शी संपर्क साधून सांगितले. तर शाळेचे मुख्याध्यापक राजपूत यांना याबाबत विचारले असता. मला मीडियाशी बाेलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगून बाेलण्यास नकार दिला. 

बातम्या आणखी आहेत...