आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात बियाणे उशिरा आल्याने धूळपेरणी नगण्य; खरीप हंगााम शेतकरी सज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची जिल्ह्यात अद्यापही पूर्णत: अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम अजूनही जमा झाली नसल्याने खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास बॅंका अनुत्सुक आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ पावणेदोन टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. दरम्यान, यंदा बाजारात बियाणे उशिराने दाखल झाल्यामुळे धूळ पेरणीचे प्रमाण नगण्य आहे. 


जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना सातशे कोटींवर कर्जमाफी मिळाल्याचे सहकार विभागातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली, ही आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या माेठी आहे. त्यातच २००१ ते २००९ या काळातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला खरीपसाठी बँकांनी पीक कर्ज वाटप करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सरकारच्या आदेशाला बंॅका जुमानत नसल्याची परिस्थिती आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या थकबाकीवरील व्याज बँकांनी आकारू नये, असे आदेश ही शासनाने दिलेले आहेत. त्यालाही बँकांनी न जुमानता थकीत रकमेवर शेतकऱ्यांकडून व्याज आकारणी करत आहेत. अशा परिस्थितीत पीक कर्ज वाटप अतिशय संथगतीने सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी पीक कर्ज वाटपाला गती मिळालेली नाही. जिल्ह्यात १२ मे पासून धूळपेरणी करण्यात येत असते. यंदा बाजारात बियाणे उशिराने दाखल झाल्यामुळे धूळ पेरणीचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे आता पाऊस पडल्यानंतरच जूनमध्ये पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. 


सहा हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप 
आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंॅक, राष्ट्रीयकृत बंॅका, ग्रामीण बंॅक व खासगी बंॅक मिळून ६ हजार ३०४ शेतकऱ्यांना ५२ कोटी १७ लाख २७ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात यंदा २९४४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट बॅँकांना देण्यात आलेले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ १.७७ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...