आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये श्रीपाद छिंदमवर कारवाईची विविध संघटनांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- अहमदनगरच्या उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, विविध दलित संघटना व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार व पोलिसांना निवेदन दिले आहे.

 


अहमदनगरच्या उपमहापौरांनी छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करून संपुर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. छिंदम हा गुन्हेगारी प्रवृतीचा असुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भारिप बहूजन महासंघ व सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसिदार कुंदन हिरेे व पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांना दिले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येेवले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, भारिपचे जिल्हा मार्गदर्शक सिताराम पारधे, भूपेश पाटील, राजेश्वर बारी, चेतन कापूरे, शिवाजी बारी, श्रीराम चौधरी, मनोहर पाटील, इश्वर चौधरी, किरण शिंदे, वैभव बिरारी, महेंद्र पाटील, दिपक बारी, गौरव पाटील, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते वसंत भोसले, कलीम शाह, शेख मुस्ताक, राहूल महाजन, यशवंत जासूद, मो. तैफुर कादरी, सारंगधर कोही, अनिकेत सोरटे, बापू जासुद यांच्यासह शेकडोच्या संख्ख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी नायब तहसिलदार वैभव पवार, पोलिस निरीक्षक डी.के. परदेशी यांना निवेदन देत श्रीपाद छिंदम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

 

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि व्हिडीओ...

 

बातम्या आणखी आहेत...