आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरची मुले बोलावून रस्त्यावर वर्गमित्राला मारहाण; सलगतीन दिवसांपासून हाणामारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मोबाइल चोरीच्या संशयावरून आर.आर.विद्यालय आणि समोरील रस्त्यावर शनिवारी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. आर.आर.शाळेतील एका विद्यार्थ्याने बाहेरच्या मुलांना बोलावून शाळेसमोरील रस्त्यावरच वर्गमित्राला मारहाण केल्याने शाळेत प्रचंड गोंधळ झाला. विद्यार्थ्यांच्या भांडणामुळे रस्त्यावर विद्यार्थी,पालक आणि रिक्षावाल्यांची गर्दी झाली होती. 


आर.आर.विद्यालयात समोरील रस्त्यावर दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढदिवसाच्या दिवशी मोबाइल चोरल्याच्या संशयावरून गेल्या तीन दिवसांपासून हाणामारी होत आहे. शनिवारी सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांसह बाहेरून आलेल्या मुलांनी दहावीतील विद्यार्थी सच्चिदानंद पांडुरंग सपकाळे,(रा.कानळदा) यास विद्यालयाच्या परिसरात मारहाण केली. त्यात त्याची मान,नाका- तोंडाला नखे लागून रक्त निघाले होते. शर्टची बटणे तुटली होती. या घटनेनंतर सच्चिदानंद याचे वडील पांडुरंग आई घटनास्थळी आले. विद्यालय परिसरातील रिक्षाचालकही तेथे जमा झाले होते. गोंधळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. गुरुवारी विद्यालयात धनंजय नावाच्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला. त्या वेळी त्याचा मोबाइल चोरीला गेला होता. त्याचा सच्चिदानंदवर चोरीचा संशय होता. त्यामुळेच त्याने बाहेरच्या विद्यार्थ्यांना बोलावून मारहाण केल्याचे सच्चिदानंदने या वेळी आपल्या आईवडिलांना सांगितले. 

 

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असताना वाहतूक पोलिसांनी तेथून जात असलेले वाहन आर.आर.विद्यालयासमोर थांबले. त्यांनी या प्रकाराबाबत माहिती घेतली. पालकांना शिक्षकांना विचारणा केली. त्यानंतर पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. प्रकरण प्रभारी मुख्याध्यापिका यांच्यापर्यंत गेले. विद्यार्थी, पालक पोलिस यांनी मुख्याध्यापिका यांच्यासोबत चर्चा केली. शेवटी विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. 


बाहेरूनआलेल्या मुले विद्यार्थ्यांची धटिंगणपणा
तीन दिवसांपासून बाहेरून आलेली मुले शाळेतील विद्यार्थ्यांना मारत आहेत. विद्यालयासमोर दुचाकीवर स्टंटबाजी करतात. मुलींची नावे घेतात. विद्यालयातील काही विद्यार्थीही या मारहाणीमध्ये अाहेत. त्यांच्या दप्तरात मोबाइल, फायटर, ब्लेड अशा वस्तू असतात. शुक्रवारीही विद्यालयासमोरच विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. विद्यालय प्रशासन मात्र काहीच कारवाई करीत नाही. बाहेरची मुले मारत असतील तर पाच-सहा दिवस शाळेत येऊ नकोस, असा उफराटा सल्ला विद्यार्थ्याला देतात, अशी माहिती रिक्षाचालक विजय बांदल, संजय कोळी, मुकेश सोनवणे, अनिल पेंढारकर यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...