आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसाने झुंज देऊन धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र

धुळे- साक्री तालुक्यातील वालझिरी व परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याशी एकेरी झुंज देत पोलिस कर्मचारी विनोद पाठक यांनी त्याला पकडले. चित्रपटात दिसणारा हा प्रसंग शनिवारी दुपारी घडला. या झुंजीत पाठक जखमी झाले. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात वनकर्मचारी जखमी झाला होता.    


साक्री तालुक्यातील निजामपूरपासून जवळच वालझिरी गाव आहे. या गावाला लागून वनक्षेत्र आहे. गेल्या काही दिवसांपासून वालझिरी व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यानुसार शनिवारी वालझिरी शिवारात बिबट्या आढळून आला. काही वेळातच पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्यामध्ये कॉन्स्टेबल विनोद पाठकही होते. दुपारपर्यंत बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले नव्हते. याउलट बिबट्याने एका वनकर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. गर्दी होऊ नये म्हणून शेताजवळ असलेल्या एका नाल्याजवळ पाठक तैनात होते. याचवेळी झुडपांमध्ये दडलेला बिबट्या त्यांना दिसला. धडधाकट शरीरयष्टी असलेले पाठक यांनी क्षणाचा विलंब न करता त्याच्यावर झडप घातली. शिवाय आपल्या मजबूत बाहूमध्ये त्यांनी बिबट्याला जखडून ठेवले. प्रतिकार करताना बिबट्याने पाठक यांना जखमी केले.

बातम्या आणखी आहेत...