आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल- मुला-मुलींच्या अांतरजातीय विवाहांना कुटुंबीयांतून माेठा विराेध असताे. काही जातपंचायती संबंधित कुटुंबाला वाळीत टाकतात. मात्र, जळगाव जिल्ह्यातील भाेरगाव लेवा पंचायत त्यास अपवाद अाहे. ‘मुला-मुलींनी अांतरजातीय विवाह केला तरी ते लेवा समाजाचेच राहणार,’ अशी घटना या पंचायतीने ३४ वर्षांपूर्वीच अस्तित्वात अाणली. या समाजाचे महाअधिवेशन ४ फेब्रुवारी राेजी यावल तालुक्यातील पाडळसे येथे हाेत अाहे.
देशभरात विखुरलेला लेवा समाज भाेरगाव लेवा पंचायत पाडळसे (ता. यावल) यांनी दिलेला निकाल शिरसावंद्य मानताे. सन १७६८पासून या पंचायतीचे काम सुरू अाहे. काैटुंबिक विषयांवर दिलेल्या निकालाच्या सन १९४४ पासूनच्या नाेंदी त्यांच्याकडे उपलब्ध अाहेत. कुटुंबनायक म्हणून रमेश विठू पाटील हे सध्या काम पाहतात. स्वातंत्र्यानंतर भारतात सन १९५२मध्ये संस्था नोंदणी अधिनियम आस्तित्वात आला. त्यानंतर संस्था नोंदणी करण्यात अाली. सन १९८४मध्ये घटनेत अांतरजातीय विवाहाची नाेंदीची टिप्पणी करण्यात अाली अाहे. कुटुंबकलहाच्या प्रकरणात (पती-पत्नीतील भांडण) सामाेपचाराला प्राधान्य असते. चिकित्सक पण जलद निकाल हे या पंचायतीचे वैशिष्ट्य अाहे. पंचायतीच्या निर्णयावर कुठल्याच न्यायालयात दाद मागितली जात नाही. कारण उच्च न्यायालयाची तिला मान्यता अाहे.
देश-परदेशात उद्याेग व्यवसायानिमित्त विखुरलेला लेवा समाज अन्याय झाला तर या पंचायतीत न्याय मागण्याचा प्रयत्न करताे. गेल्या १० वर्षांत या पंचायतीने ८ हजार ५०० दांपत्याच्या संसाराची रेशीमगाठ पुन्हा घट्ट बांधली.
स्वातंत्र्य अन् समाजमान्यता
बहुतांश जातपंचायती मुला-मुलींनी अांतरजातीय विवाह केला तर हिंसक भूमिका घेतात. मात्र, सन १९८४ मध्ये भाेरगाव लेवा पंचायतीची घटना धर्मादाय अायुक्तांकडे नाेंद केली. त्यानुसार ‘मुला-मुलींनी अांतरजातीय विवाह केला तरी ते लेवा समाजाचेच राहतील’
- रमेश विठू पाटील, कुटुंबनायक, भाेरगाव लेवा पंचायत, पाडळसे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.