आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील बसपाच्या नेत्याला जळगावातून धमकी; अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उत्तर प्रदेशातील बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्याला काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील एका मोबाइल क्रमांकावरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली गेली होती. या प्रकरणी फैजाबाद येथील पोलिसांचा ताफा रविवारी जळगावात दाखल झाला होता. त्यांनी संपुर्ण दिवस शोधमोहीम राबवली. परंतु काहीच निष्पन्न झाल्यामुळे अखेर ते परत गेले. 


उत्तरप्रदेश येथील फैजाबादचे बहुजन समाजवादी पार्टीचे नेते अानंदसेन मित्रसेन यादव यांना २७ नाेव्हेंबर २०१७ राेजी धमकी आल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात अदखलपात्रगुन्हा दाखल केला होता. अयोध्येतील राम मंदिर बनवण्याच्या विषयावरून त्यांना धमकी मिळाली होती. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत केले आहे. बसपा नेते अानंदसेन यादव यांना धमकी आलेल्या मोबाईलचे लोकेशन काढण्यात आले. ते जळगाव शहर, शेंदुर्णी जामनेर येथील असल्याचे निष्पन्न झाले अाहे. त्यानुसार रविवारी सकाळी फैजाबाद पोलिस जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी संबंधित नंबरचे लोकेशन तसेच इतर गाेष्टींबाबत दिवसभर शोध घेतला. परंतु त्यांच्या हाती काही ठाेस माहिती लागली नाही. 


सोपान पाटलांची चौकशी
सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सोपान भिका पाटील यांना दुपारी वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बोलावले होते. उत्तरप्रदेश पोलिसांनी पाटील यांची तास कसून चौकशी केली. पाटील यांनीच हा फोन केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तर मोबाइल लाेकेशननुसार अन्य दाेन जणांची चाैकशी करण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...