आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर पेट्रोल पंपचालकाच्या खुनातील तीन संशयितांना अटक; मुख्य संशयित कैलास नवघरे अद्यापही बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अमळनेरातील पेट्रोल पंपाचे मालक अली अजगर हकीमोद्दीन बोहरी (वय ५३) यांची हत्या करणाऱ्या चौघांपैकी तीन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली आहे. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली अाहे. मुख्य संशयित कैलास नवघरे बेपत्ता आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 


मुस्तफा शेख मोहम्मद (वय २४, रा.गांधलीपुरा, अमळनेर), तनवीर शेख मुख्तार शेख (वय २३, ख्वॉजानगर, अमळनेर) व तौफीक शेख मुनीर (वय २३, रा.गांधलीपुरा, अमळनेर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कैलास हाच मुख्य संशयित असून त्यानेच बोहरी यांच्यावर गोळी झाडली होती. ३ मे रोजी रात्री चौघांनी बोहरी यांच्याकडील पैशांची बॅग लांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, झटापटीत बोहरी पळून जाण्याचा प्रयत्न करताच नवघरेने त्यांच्यावर गोळी झाडली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलिस अधीक्षक कराळे यांनी पथकास १० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...