आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताहराबाद -पिंपळनेर रस्त्यावर भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू; 2 जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळावरील भीषण दृश्य. - Divya Marathi
घटनास्थळावरील भीषण दृश्य.

पिंपळनेर (धुळे)- ताहराबाद -पिंपळनेर रस्त्यावर कातरवेल गावाजवळ शेलबारी घाटात झालेल्या 3 दुचाकीच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या युवकाचा मृत्यू उपचारासाठी नेत असताना वाटेत झाला. 

 

 

पिंपळनेर पोलिस स्टेशनजवळ राहणारा लक्ष्मण उर्फ (लकी)मिलिंद बैसाणे हा सटाणाकडुन पिंपळनेरकडे येत असतांना पिंपळनेरकडून हळदी समारंभासाठी जात असलेले पती पत्नी मोटार सायकलने जात होते. आज दुपारी दीडच्या सुमारास शेलबारी घाटात दोन्ही  दुचाकींची जोरदार टक्कर झाली. त्यात दौलत भटु भदाणे (वय 58 वषॅ, रा. उंभटीॅ. ता.साक्री) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी कमलबाई  दौलत भदाणे यांना जबर धडक बसली.  दुसऱ्या दुचाकीवरील  लक्ष्मण (लकी) मिलिंद बैसाणे (वय 23 वषॅ) व त्यांच्यासोबत असलेला गणेश सदाशिव सोनवणे (वय 18 वषॅ) हे गंभीर जखमी झाले. अपघात झाला त्यावेळी मयत दौलतचे भाऊ व  त्यांची पत्नी  दुसर्‍या दुचाकीने हळदीच्या कार्यक्रमासाटी सटाणा येथे जात होते. त्यांच्या समोरच भावाचा अपघात झाल्याने त्यांचाही वाहनावरील तोल गेला. घटनास्थळी पिंपळनेरचे पोलिस व सामाजिक कार्यकर्ते पोहचले व त्यांनी मिळेल त्या वाहनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमी लकी व गणेश यास धुळे येथे उपचारासाठी नेत असताना लकीची प्राणज्योत साक्रीतच मावळली. साक्री ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.  कमलाबाई भदाणे यांच्यावर पिंपळनेर येथील डॉ. जितेश चौरे यांच्याकडे प्राथमिक उपचार करुन नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे तर गणेश सोनवणे हा धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असुन त्याचीही स्थिती गंभीर  आहे. घटनास्थळी उपनिरीक्षक योगेश खटकळ व त्यांचे सहकारी मदतीसाठी आले होते.  अपघात जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असुन पिंपळनेरला 0 नंबरने त्याची नोंद करण्यात आली आहे. लकी बैसाणे हा सामोडे येथील ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बैसाणे यांचा मुलगा होता.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती


 

बातम्या आणखी आहेत...