आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा छळ करणाऱ्या पतीस 3 वर्षे कारावास; मुलगा हाेत नसल्याने देत हाेता त्रास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पतीस जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 


अमळनेर येथील शाहिस्ता खाटीक हिचा सन २००७ मध्ये शरीफ वहाब खाटीक (रा. वावडदा) याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर शाहिस्ता नांदण्यास आली असता तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी सारखा तगादा लावत होता. त्यातच त्या दोघांना चार मुली झाल्याने पती शरीफ याने मुलगा होत नसल्याने शिविगाळ व मारहाण करीत होता. नित्याच्या मारहाणीमुळे व मानसिक छळाला कंटाळून शाहिस्ता यांनी अमळनेर येथील कौटुंबीक सल्ला केंद्राकडे तक्रारदेखील केलेली होती. त्यानंतर मध्यस्थांनी दोघांमध्ये तडजोड केली. भविष्यात पत्नीला त्रास देणार नाही, असा करारनामा शरीफ याने केंद्राकडे लिहून दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याने पत्नी शाहिस्ता यांना तुझ्यापोटी मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत तुझा छळ करीतच राहील, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत राहिला. पतीच्या नेहमीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ३० सप्टेंबर २०१४ रोजी तिने स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली हाेती. 


मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून शाहिस्ता यांची आई नसीमबी भिकन खाटीक यांनी जावई शरीफ याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास अधिकारी अहिरे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी नसीमबी खाटीक यांचा जबाब तसेच अमळनेर येथील कौटुंबीक सल्ला केंद्राकडील करारनामा महत्वपूर्ण ठरला. 


कलम ९९८ नुसार शिक्षा 
या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड.चारूलता बोरसे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी फिर्यादी पक्षाचा पुरावा उचित ठरवला आणि आरोपी शरीफ याच्याकडून पत्नी शाहिस्ता हिच्यावर झालेला मानसिक व शारीरिक छळ प्रकरणात भादंवि कलम ९९८ अ नुसार २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सिद्ध झाल्याने ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड ठोठावला. 

बातम्या आणखी आहेत...