आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक जूनपासून एसटी भाडेवाढीचे संकेत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डिझेलची सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे हिशेबाचे आकडे जुळवताना एसटी महामंडळाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी    दिले आहे.   सध्या डिझेलची सतत दरवाढ होत आहे. मुळात एसटीचा २ हजार ३०० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. त्यातच कामगारांच्या वेतन कराराचा मोठा भार पडणार आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल परदेश दौऱ्यावर आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात आल्यानंतर दरवाढीवर चर्चा करून सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.  


३ महिन्यांत ४७० कोटींचा फटका 

 गेल्या तीन महिन्यांत डिझेल दरवाढीने एसटी महामंडळाला ४७० कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसला आहे. डिझेल दरवाढ आणि एसटी बसचे सध्याचे तिकिटांचे दर याचा हिशेब जुळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता तिकीट दरवाढ केल्याशिवाय एसटीला पर्याय नसल्याचे  परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, अद्याप याविषयीचे कोणतेही पत्र, सूचना  प्राप्त नसल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...