आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची पावडर व तलवार घेऊन प्रवास करणारे दोन जण यावल पोलीसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिपक श्रावण लोखंडे व सागर संजय शेटे - Divya Marathi
दिपक श्रावण लोखंडे व सागर संजय शेटे

यावल- चारचाकी वाहनातून मिरची पावडर व तलवार घेऊन जाणाऱ्या दोघ जणांना यावल पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे. भुसावळ येथील हे दोघे जण असल्यासे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली उडली असून हे दोघे कोणत्या उद्देशाने शस्त्र व मिरची पुड घेवून निघाले होते याचा तपास पोलीस करीत आहे. शुक्रवारी रात्री यावल-चोपडा मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ ही करवाई करण्यात आली. 


पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फैजपूरचे डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी नाकाबंदीचे आदेश दिले. पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक एम .जे. मोरे, उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, संजय तायडे, हवालदार विजय चौधरी, सतिश भोई, ज्ञानेश्वर कोळी, संजय देवरे, राहुल चौधरी यांच्या पथकाने यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर वनविभागच्या कार्यालयाजवळ सापळा रचून होंडा सिटी (एम.एच. १९ एन. ए. १६२९) गाडीला अडवले. यावेळी गाडीतून एक तलवार आणि ५० ग्रम मिरची पावडरसह दिपक श्रावण लोखंडे (वय २३) व सागर संजय शेटे (वय २३) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघेही भुसावळ येथील आर पीएफ बॅरेक जवळ, लिंपस क्लब परिसारतील रहिवाशी आहेत. हे दोघे कोणत्या उद्देशाने या भागात शस्त्र घेवुन निघाले होते याचा तपास पोलिस हवालदार संजय तायडे करीत आहेत.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...