आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात दाेन महिला, एका तरुणीने संपवली जीवनयात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात २ महिला व तालुक्यातील १ तरुणीने वेगवेगळ्या कारणांनी अात्महत्या केल्याच्या घटना साेमवारी उघडकीस अाल्या. देवेंद्रनगरात विवाहितेने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती विवाहितेच्या पतीला कळवल्यानंतर ते घाईने घरी येत असताना ते दुचाकीवरून पडून जखमी झाले. खेडी येथे मुलीकडे राहणाऱ्या महिलेने मेहरूण तलावात आत्महत्या केली. तसेच मुलीच्या लग्नासाठी आर्थिक विवंचनेमुळे दापाेरा येथील पित्याने विषप्राशन केले. हे कळाल्यानंतर मुलीने विषप्राशन केले. उपचारादरम्यान त्या मुलीची प्राणज्योत मालवली, तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनामुळे समाजमन चिंतीत झाले अाहे. 


देवेंद्रनगरात विवाहितेचीे गळफास घेऊन अात्महत्या; नातेवाइकांचा संशय 
देवेंद्रनगरात सोमवारी दुपारी १२.३० ते १.२५ वाजेदरम्यान घरात कुणी नसताना अंजली दिनेश थोरात या विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार विवाहितेच्या पाच वर्षाच्या मुलाने शाळेतून घरी आल्यानंतर पाहून त्याने लागलीच शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर ही माहिती महिलेच्या पतीला कळविल्यानंतर ते घाईने घरी येत असताना एमआयडीसीमध्ये दुचाकीवरून पडून जखमी झाले. दरम्यान, सायंकाळी मृत महिलेचे माहेरचे नातेवाईक जळगावाला आल्यानंतर त्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. 


देवेंद्रनगरातील अंजली दिनेश थोरात (वय ४३) यांनी दुपारी कॉटवर स्टूल ठेवून छताच्या आसारीला ओढणी लावून गळफास घेतला. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांचा मुलगा श्रेयस हा सेंट टेेरेसा शाळेतून घरी आला. त्याने दरवाजा ढकलला. त्यावेळी त्याला बेडरूममध्ये आई गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्याने रडत रडत हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. शेजाऱ्यांनी अंजली यांचे पती दिनेश थाेरात व एमआयडीसी पोलिसांना या घटनेबाबत कळवले. थाेरात यांची एच. डी. इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आहे. त्यांनी साेमवारी एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये इव्हेंटचे काम घेतलेले होते.


खेडीच्या महिलेची मेहरूण तलावात आत्महत्या 
जळगाव- खेडी येथे मुलीकडे राहणाऱ्या महिलेने मेहरूण तलावात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. सीम कार्डवरून महिलेची ओळख पटली. तिने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. 


सुनंदा सयाजी पाटील (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. पादचारी व्यक्तींना तिचा मृतदेह तलावाच्या पूर्वेस तरंगताना आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह सिव्हिलमध्ये नेला. तिच्याजवळ कागदात गुंडाळलेले सीमकार्ड आढळून आले. त्या आधारे पोलिसांनी तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तेव्हा या महिलेचे जावई ईश्वर पाटील व मुलगी सविता पाटील हे जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी मृतदेह ओळखला. सुनंदा यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तसेच त्यांचा मुलगाही मृत झालेला आहे. त्यामुळे त्या जावई व मुलीकडे खेडी बुद्रूक येथे राहात होत्या. रविवारी दुपारी १२ वाजता त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यांना नैराश्य आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...