आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर उलटल्याने दोन युवक ठार, एक जखमी; जळगाव जिल्ह्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव जिल्ह्यातील भरवाडे-चांदपुरी रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्याने दोन युवक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास झाला. शिरपूर तालुक्यातील हिंगाेणी येथील गोपाल पाटील (२४), शिंगावे येथील विशाल पाटील (२३) व सावकद येथील अर्जुन खंडू भिल हे साेमवारी पहाटे ट्रॅक्टरने शेतात जात होते. ट्रॅक्टर अर्जुन खंडू भिल चालवत होता. त्या वेळी हूक तुटल्याने ट्रॅक्टर उलटले. यात गोपाल पाटील, विशाल पाटील हे ठार झाले, तर अर्जुन खंडू भिल जखमी झाला. अपघातानंतर जखमीसह मृतांना सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या  तरुणांच्या मृत्यूने हिंगोणी, शिंगावे परिसरावर शोककळा पसरली. विशालचे वडील तालुक्यातील निमझरी येथील आर. सी. पटेल आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा विशाल हा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहेत.  हिंगोणी येथील गोपालला चार बहिणी आहेत. गोपाल हा हिंगोणीचे माजी सरपंच राजेंद्र पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता.   दुपारी दोन वाजता  मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...